रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Modified: शनिवार, 18 मे 2024 (06:00 IST)

माहुरगडावरी देवीची आरती Mahur Gadavari Aarti

mahurgarh
माहुरगडावरी देवीची आरती
माहुरगडावरी माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास ॥धृ.॥
 
पिवळे पातळ ग पिवळे पातळ बुट्टेदार, अंगी काचोळी हिरवीगार
पितांबराची ग पितांबराची खोवून कास, भक्त येतील दर्शनास ॥१॥
 
बिंदीबिजवरा ग बिंदीबिजवरा भाळी शोभे, कर्णि बाळ्यान वेलझुबे
इच्या नथेला ग इच्या नथेला हिरवा घोस, भक्त येतील दर्शनास ॥२॥
 
सरी ठुसीन ग सरी ठुसीन मोहनमाळ, जोडवे मासोळ्य़ा पैंजन चाळ
पट्टा सोन्याचा ग पट्टा सोन्याचा कमरेला, हाती हिरवा चुडा शोभला ॥३॥
 
जा‌ईजु‌ईची ग जा‌ईजु‌ईची आणली फुले, भक्त गुंफीती हारतुरे
हार घालिते ग हार घालिते अंबे तुला, भक्त येतील दर्शनास ॥४॥
 
इला बसायला ग इला बसायला चंदनपाट, इला जेवाया चांदीचे ताट
पुरणपोळी ग पुरणपोळी भोजनाला, मुखी तांबुल देते तुला
खणनारळाची खणनारळाची ओटी तुला, भक्त येतील दर्शनास ॥५॥
 
माझ्या मनीची मानसपुजा, प्रेमे अर्पिली अष्टभुजा
मनोभावाने ग मनोभावाने पुजीते तुला, भक्त येतील दर्शनास ॥६॥