गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By

विडा घ्याहो रघुवीरा

विडा घ्याहो रघुवीरा । रामा राणारंगधीरा ॥
विनवीते जनकबाळी । भावे जोडोनीयां करां ॥ धृ. ॥
शांतिवनामाजी मृदु । पिकलि नागवेली पानें ॥
अहंभाव जाळूनीयां । केला शुद्ध सत्वचुना ॥ विडा. ॥ १ ॥
प्रपंच सुपारी हे । ऎक्यशस्त्रें फोडीयली ॥
मुमुक्षाकापुराने । निजरंगी रंगविली ॥ विडा. ॥ २ ॥
भावार्थ कातगोळ्या । ज्ञानलवंगा उपरि ॥
वैराग्यजायफळ । प्रेमजायपत्रिवरी ॥ विडा. ॥ ३ ॥
सच्चिदानंदमूर्ती । माझी परिसावी विनंती ॥
जयराम सेवक ऊभा । तबक घेऊनीयां हातीं ॥विडा. ॥ ४ ॥