Festival Posters

श्रीराम आरत्या मराठीत

Updated: सोमवार, 22 जानेवारी 2024 (09:54 IST)
थोर आनंद सकळा जनासि ।
कृष्ण गोपाळ लागे चरणांसी ॥ जय. ॥ ४ ॥
 
****************************
स्वात्मसुखामृत सागर जय सद‌गुरुराया ।
वेदांतार्णव मथितां तिलगुह्यापरमा ॥
निज निंर्गुण जगलीला जगदाकृति हेमा ।
जगदिश्वर तद्रूपा वरमंगल धामा ॥ १ ॥
जय देव जय देव जय सद्‌गुरुराया ।
ब्रह्म सुधाऽमर चिद्‌घन जय सार्वभौमा ॥ धृ. ॥
चिन्मय वस्तु तुं अगुणी सगुणाकृति धरिसी अगणित गुणगंभीर गुरु ईश्वरही होसी ।
अज्ञानांध सुशिष्या स्वप्रकाश करिसी ॥
शरणागत भवपाशापासुनि सोडविसी ॥ जय. ॥ २ ॥
स्वस्वरु पोन्मुखबुद्धी वैदेहि नेली ।
देहात्मका भिमाने दशग्रीवें हरिली ॥
सद्विवेक मारुतिनें सत्शुद्धी आणिली ।
तव चरणांबुजि येउनि वार्ता श्रुत केली ॥ जय. ॥ ३ ॥
देहादिक अहंकार रावणवध करिसी ।
केवल स्वमुखानंदी वससी अयोध्येसी ॥
सर्वांतरि व्यापुनियां सबाह्य तूं अससी ।
गुरुभक्तीहिन पुरुषा कोठे आढळसी ॥ जय. ॥ ४ ॥
देहत्रय व्यतिरिक्ता साक्षी समसंता ।
परमा नंदाऽनंता अद्वयरस भरिता ॥
करुणाऽगर भयनाशन श्रीदैशिक नाथा ।
स्वानंद्रे पद मौनी वंदित रघुनाथा ॥ जय. ॥ ५ ॥
 
 
****************************
आजि रघुपति तव चरणीं करितों ही आरती ।
ओंवाळिसें प्रेमभरें प्रभु तुज लागो रति ॥ धृ. ॥
तव नामामृत पानें करूनी जड मुड उद्धरले ।
दुष्ट निशाचर वधुनि सुरांचे रक्षण त्वां केलें ॥'
बलवंत गाई प्रीती ॥आजि. ॥ १ ॥
 
 
****************************
बंबाळ कर्पुराचे । दीप रत्नकीळांचे ॥
उजळले दिग्मंडळ । मेघ विद्यूल्लतांचे ॥
भासती तयांपरि । भालचंद्रज्योतीचे ॥
अवचिते झळकताती ।घोंस मुक्ताफळाचे ॥ १ ॥
जय देवा दीनबंधू । राम कारुण्यसिंधू ॥
आरति ओवाळीन । शिव मानसी वेधु ॥ धृ. ॥
त्राहाटिली दिव्य छत्रें । लागल्या शंखभेरी ॥
तळपताती निशाणें । तडक होतसे भारी ॥
तळपती मयूरपिच्छें । तेणें राम थरारी ॥ जय. ॥ २ ॥
मृदंगटाळघोळ । उभे हरिदासमेळ ॥
वाजती ब्रह्मवीणे । उठे नादकल्होळ ॥
साहित्य नटनाट्य । भव्यरंगरसाळ ॥
गर्जती नामघोष लहानथोर सकळ ॥ जय. ॥ ३ ॥
चंपकपुष्पजाती ॥ मेळविले असंख्यांत ॥
दुस्तर परिमळाचे ॥ तेणें लोपली दीप्ती ॥
चमकती ब्रह्मवृंदे ॥ पाउलें उमटती ॥
आनंद सर्वकाळ ॥ धन्य जन पाहाती ॥ जय. ॥ ४ ॥
ऋषिकुळी वेष्टित हो ॥ राम सूर्यवंशीचा ॥
जाहलीं अतिदाटी ॥ पुढे पवाड कैसा ॥
सर्वही एकवेळ ॥ गजर होतो वाद्यांचा ॥
शोभती सिंहासनीं ॥ स्वामीं रामदासाचा ॥ जय. ॥ ५ ॥
 
 
****************************
रत्नांची कुंडलें माला सुविराजे ॥
झळझळ गंडस्थळ घननीळ तनू साजे ॥
घंटा किंकणी अंबर अभिनव गति साजे ।
अंदु वांकी तोडर नुपुर ब्रिद गाजे ॥ १ ॥
जय देव जय देव जय रघुवर ईशा ।
आरती निर्जरवर ईशा जगदीशा ॥ धृ. ॥
राजिव लोचन मोचन सुरवर नरनारी ।
परातपर अभयंकर शंकर वरधारी ।
भूषणमंडित उभा त्रीदशकैवारी ।
दासा मंडण खंडन भवभय अपहारी ॥ जय देव. ॥ २ ॥
 
 
****************************
आरती करितों राघवचरणीं ।
राहुनि अनिदित नामस्मरणीं ॥ धृ. ॥
ब्रह्मादिक मुनि सुर गाती ज्यातें ।
कैलासाधिप करिं ध्यानांते ॥ आरती. ॥ १ ॥
रावण मारुनि सुरां सुखी केलें ।
बिभीषणासी राज्यिं स्थापिलें ॥ आरती ॥ २ ॥
शरणागत मीं तुज बलवंता ।
पाहिं कृपेने या बलवंता ॥ आरती करितो. ॥ ३ ॥
 
****************************
काय करुं माय आतां कवणा ओवाळूं ।
जिकडे पाहे तिकडें राजाराम कृपाळू ॥ धृ. ॥
ओवाळूं गेलिया सद्‌गुरुरामा ।
क्षमा रूप निजपण न दिसे आम्हां ॥ काय. ॥ १ ॥
सुर नर वान्नर राम केवळ ।
खेचर निशाचर तेही राम केवळ ॥ काय. ॥ २ ॥
त्रैलोकी रामरुप साचार एक ।
सद्‌गुरुकृपें केशव राज आनंददीप ॥ काय करू माय. ॥ ३ ॥
 
****************************
 
दशरथराजकुमारा धृतमुक्ताहारा । शरयूतेरविहारा शमितक्षितिभारा । करुणापारावारा कपिगणपरिवारा । निर्गतनिखिलविकारा निगमागमसारा ॥१॥
जय देव जय देव जय सीतारामा ॥ सजलबलाहकश्यामा सच्चित्सुखधामा०॥ध्रु०॥
रविकुलराजललामा रम्यगुणग्रामा । रूपविनिर्जितकामा रुद्रस्तुतनामा । परिपालितसूत्रामा पूर्णसकलकामा । विश्वविलासविरामा विठ्ठलविश्रामा ॥जय देव जय देव०॥२॥

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments