मेष : भाऊ बहीण आणि आई वडिलांमध्ये जर कुठले वाद विवाद सुरू असतील तर या आठवड्यात ते संपुष्टात येतील. संबंधांमध्ये आत्मीयतेचा भास होईल. तुम्ही एक मेकच्या मदतीसाठी पुढे याल. घरात सुख शांतीचे वातावरण राहील. आई आणि मुलाचे आरोग्य जर खराब असेल तर या आठवड्यात त्यात सुधारणा दिसेल. नवीन घर, वाहन आणि आरामदायक जीवनासाठी तुम्ही भौतिक साधनांची खरेदी कराल.
वृषभ : बँक लोन किंवा वित्तीय मदत तुम्हाला वेळेवर मिळतील. तुमचे सर्व महत्त्वाचे कामं वेळेवर पूर्ण होतील. नोकरीत बदल करणार्या लोकांसाठी हा काळ चांगला आहे, पण त्यांना राहती जागा सोडावी लागणार आहे. व्यवसायात मशीनीची देखरेख, स्टाफ आणि लेबर वर्गासाठी पैसे खर्च करावे लागणार आहे. होटल, टूरिझम, प्रिटिंग प्रेस, फिल्म उद्योग, मीडिया, विज्ञापन, कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंशी निगडित व्यवसायात यश मिळेल.
मिथुन : प्रेम संबंधांमध्ये मधुरता येईल. तुमच्या जीवनात नवीन विपरीत लिंगी व्यक्तीचा प्रवेश होईल. विदेश किंवा दूर राहणार्या नातेवाइकाशी बोलणे होऊ शकते. घरात पाहुण्यांचे येणे जाणे सुरू राहील. या वेळेस तुमच्या मान सन्मानात वाढ होईल आणि तुम्ही सार्वजनिक जीवनात अधिक सक्रिय व्हाल. या वेळेस काही नवीन लोकांशी ओळख होईल, जी पुढे कामी पडतील.
कर्क : आयात निर्यात संबंधित कार्यांमध्ये अधिक लाभ होण्याची शक्यता आहे. स्थायी मालमत्ता, दागिने, शेयर बाजार, गारमेंट्स, स्पेयरपार्ट्स, कागद, स्टेशनरी, मीडिया, फिल्म उद्योग, सर्जरी, सरकारी कार्य, टूरिझम, परिवहनाशी निगडित व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. जर कुटुंबात एखाद्या सदस्याबरोबर वाद विवाद सुरू असेल तर या आठवड्यात परिस्थितीत सुधार होईल. वाणी व व्यवहारात संयम ठेवण्याची गरज आहे.
सिंह : सरकारी कार्यांमध्ये यश मिळण्याचे योग आहे. या वेळेस उच्च पदस्थ सरकारी अधिकारी किंवा प्रभावी व्यक्तीची मदत मिळाल्याने तुम्हाला व्यवसायात लाभ मिळेल. शॉर्टकटमुळे धनप्राप्तीचे योग तयार होत आहे, म्हणून या वेळेस जर तुम्ही शेयर बाजार आणि ट्रेडिंगच्या कार्यांमध्ये विचार करून गुंतवणूक कराल तर त्यात फायदा होण्याची शक्यता आहे.
कन्या : जोडीदार आणि संतानाच्या आनंदासाठी तुम्ही किमती वस्तूंची खरेदी करू शकता. व्यावसायिक क्षेत्रात तुमची नवीन ओळख स्थापित होईल आणि नवीन मित्र बनतील. व्यावसायिक विस्तार आणि नवीन औद्योगिक साहस करण्याचा मन बनेल. लक्षात ठेवाकी, 18 आणि 19 तारखेला व्यावसायिक कार्यांमध्ये गुप्त शत्रू अडचणी आणतील, ज्यामुळे तुमचे महत्त्वाचे काम अडकतील. जुनी स्थायी मालमत्तेशी निगडित प्रकरणात तुम्हाला समाधान मिळेल.
तूळ : जुने उधार परत मिळाल्याने तुमची आर्थिक स्थितीत सुधारणा येईल आणि काळजी कमी होईल. धन प्राप्तीसाठी उत्तम योग बनत आहे. जुने मित्र अचानकच भेटतील. चांगली आर्थिक स्थिती झाल्याने तुम्ही शेयर बाजारात गुंतवणूक करू शकता. खाद्य सामग्री, गारमेंट्स, टूर्स ट्रावेल्स, होटल, विमा एजेंसी, दलाली, ट्रेडिंग, कंसल्टेंसी, एकाउंटेंसी आणि वाकलात संबंधित कार्यांमध्ये अधिक फायदा होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : डोळे आणि कानाशी संबंधित तक्रार होण्याची शक्यता अधिक आहे. 22 आणि 23 तारखेला तुमचा अपघात होण्याची शक्यता आहे, त्यासाठी खबरदारी घ्या आणि पाण्यापासून दूर राहा. व्यवसायाच्या प्रगतीसाठी हा आठवडा फारच अनुकूल आहे. तुम्ही तुमच्या व्यवसाय विस्तारासाठी नवीन मशीनीची खरेदी करू शकता. या आठवड्यात उत्पादन आणि विक्रीत वाढ होईल. बाजारात तुमच्या उत्पादाचे नाव होईल.
धनू : परिवार आणि जीवन साथीसोबत प्रवासाचे बेत बनू शकतात. भाऊ, बहिणीच्या नात्यात सुधारणा येईल. तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेमुळे व्यवसायात चांगला फायदा मिळवाल. उधारीच्या वसुलीसाठी तुम्हाला फारच धावपळ करावी लागणार आहे पण तुमचे कार्य पूर्ण होतील. प्रेम संबंधांमध्ये निकटता येईल. तुम्ही कोणाच्या समोर प्रेम प्रस्ताव ठेवाल तर त्याचे सकारात्मक उत्तर मिळेल.
मकर : जर बर्याच वेळापासून परदेशात जायचे मन बनवत असाल तर या आठवड्यात पुन्हा प्रयत्न करायला पाहिजे. पण या आठवड्यात तुमच्या स्वभावात उग्रता आणि व्यवहारात कठोरता असेल. त्यामुळे कार्यस्थळावर तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागणार आहे खास करून अधीनस्थ सहकार्यांबरोबर व्यवहार करताना. त्याशिवाय उच्च अधिकार्यांसोबत थोडे वाद होण्याची शक्यता आहे. 19 तारखेला मित्र आणि भागीदारांशी बोलताना सावधगिरी बाळगा.
कुंभ : तुम्ही सध्या तुमचे उत्पाद आणि सेवेच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष द्याल आणि बाजारात आपली एक नवीन ओळख कायम करण्यात यशस्वी ठराल. नवीन विस्तार किंवा उद्योगात बदल करण्यासाठी ग्रहदशा शुभ संकेत देत आहे. देश विदेश संबंधित व्यवसायात तुम्हाला चांगले आर्डर मिळू शकतात. एखादा राजनेता, सरकारी उच्च अधिकारी किंवा प्रभावी व्यक्तीच्या ओळखीमुळे तुम्हाला व्यावसायिक विस्तारासाठी मदत मिळू शकते.
मीन : नवीन लोकांशी भेट होण्याची शक्यता असून मित्रांच्या संख्येत वाढ होईल. 20 तारखेला सोडून संपूर्ण आठवडा चांगला जाणार आहे. जे लोक विवाहासाठी उत्सुक आहे, त्यांना जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. परदेशात काम करणार्या लोकांच्या टर्नओवर वाढेल. सरकारी नोकरी करणार्या जातकांना राहत्या जागेपासून दूर जाण्याचा योग आहे. व्यवसायात भागीदाराकडून उत्तम सहकार्य आणि आर्थिक लाभ मिळण्याची उमेद तुम्ही ठेवू शकता.