गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2018
Written By

कर्क राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल

कर्क राशीच्या जातकांना 2018 या वर्षात गुरु आणि मंगळ या दोन ग्रहांची तुम्हाला चांगली साथ आहे. पण शनी षष्ठस्थानात राहत असल्यामुळे प्रत्येक बाबतीत तुम्हाला तडजोड करावी लागेल. गेल्या वर्षात व्यावसायिक प्रगती चांगली असूनही तुम्हाला ज्या अनपेक्षित प्रश्नांना तोंड द्यावे लागले होते त्याची तीव्रता येत्या वर्षात आता कमी होईल आणि ती कसर भरून काढणे हेच तुमच्यापुढील महत्त्वाचे उद्दिष्ट असेल. नवीन वर्षात गुरुची साथ वर्षभर मिळत असल्यामुळे तुमचा दृष्टिकोन अधिक आशावादी बनेल. 
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... 
खर्च प्रमाणापेक्षा अधिक असेल. उत्पन्न असेल पण तुम्ही तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, कारण त्यामुळे आर्थिक असंतुलन निर्माण होईल. विद्यार्थी चांगली कामगिरी करतील आणि अधिक निर्धारी होतील. तुम्ही ऐषारामी आयुष्य जगाल कारण आयुष्याचा आनंद लुटणे आणि खर्च करणे हाच तुमचा उद्देश असेल. त्यासाठी तुम्ही कष्ट घ्याल. एकुणात, काही आव्हाने येतील पण हे वर्ष तुमच्यासाठी अनुकूल राहील. नोकरदार व्यक्तींना थोडेस कंटाळवाणे वर्ष आहे. जे काम तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्हाला काहीतरी बदल हवा असेल. पण तो न मिळाल्याने तुमची थोडीशी चिडचिड होईल. फक्त त्या नादामध्ये चुकीचे निर्णय घेऊ नका. सप्टेंबरनंतर पुन्हा एकदा नवीन योजना तुमच्या मनात घोळू लागतील आणि त्या डिसेंबरापूर्वी पूर्ण होतील. या दरम्यान तुम्ही अधिक वास्तववादी बनाल.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान....
गृहसौख्य व आरोग्यमान... 
तुमचे काही आप्तेष्ट तुम्हाला योग्य प्रकारे समजून घेणार नाहीत आणि त्यामुळे तुमच्या नात्यांमध्ये काहीसे वितुष्ट येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आयुष्य काही प्रासंगिक भांडणे वगळता हे सलोख्याचे असेल. तुमची प्रतिमा उंचावेल आणि कामाच्या स्वरूपात सुधारणा होईल. तुमचा सामाजिक स्तरही उंचावेल. मुख्य लक्ष आरोग्यावर असणे आवश्यक आहे कारण गंभीर आजार बळावण्याची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आनंद नसल्याचे वाटत राहील. तुमचे वैवाहिक आयुष्य टिकवून ठेवण्यासाठी वाद टाळावेत. घरामध्ये एखादे मंगलकार्य ठरत नसेल तर ते निश्चित होईल. ज्यांना राहत्या जागेत बदल करायचे असतील त्यांच्याकरिता नवीन वर्ष विशेष फलदायी आहे. स्वत:च्या नवीन वास्तूचे स्वप्न एप्रिल -मेनंतर साकार होईल. तरुणांचे विवाह जमतील. प्रकृतीच्या दृष्टीने वर्ष चांगले नाही. जुन्या आजारांमुळे तुम्हाला त्रास संभवतो.