शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2018
Written By

जानेवारी 2018 महिन्याचे भविष्यफल

मेष
जानेवारी - या महिन्यात मुलांच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी लागणार आहे. विद्यार्थी वर्गाला आपल्या कामावर जोर द्यावा लागणार आहे. दांपत्य जीवनात विवाद होण्याची शक्यता आहे. पारिवारिक प्रकरणात काळजी राहील. यश मिळवण्यासाठी अधिक पराक्रम करावे लागणार आहे. शत्रुपक्षाकडून राहत मिळेल व धंदा चांगला चालेल. कामासाठी प्रवास घडेल. उत्तरार्धात आर्थिक प्राप्ती वाढेल. या महिन्यात बढतीचे योग आहे. कायदेशीर बाबींमध्ये लक्ष द्या. वाहन जपून चालवा. विवाह जुळतील. 
 
वृषभ
जानेवारी - थोडे परिश्रम आणि थोडा संयम ठेवला तर तुम्ही तुमचे उद्देश्य पूर्ण करण्यात नक्कीच यशस्वी व्हाल. दांपत्य जीवनात थोडा तणाव राहू शकतो. पारिवारिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगा. शत्रुपक्षावर प्रभाव कायम राहणार आहे. आरोग्य महिन्याभर उत्तम राहील. भाग्यकारक अनुभव येईल. नवीन वस्त्रे घ्याल. नातेवाइकांची ये जा राहणार आहे. सुवर्णालंकाराची खरेदी कराल. दि. 16च्या दरम्यान जोडीदाराशी वाद टाळा. सामाजिक कार्यात सहभाग राहाल. 
 
मिथुन
जानेवारी - थोडे परिश्रम व थोडी समजूतदारीने तुम्ही तुमच्या कामात अपेक्षेनुसार यश मिळवण्यास तुम्ही समर्थ व्हाल. आरोग्य उत्तम राहणार आहे. कौटुंबिक बाबतीत भाग्याची स्थिती उत्तम राहणार आहे. दांपत्य जीवनात संमिश्र स्थिती मिळेल. संतानचे विवाह जुळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाला शिक्षणात यश मिळेल. वरिष्ठांकडून गौरव होईल. संतती होईल. आर्थिक करार होतील. हातात पैसा मिळण्याची वाट बघावी लागणार आहे. शारीरिक व्याधी जाणवेल. 
 
कर्क
जानेवारी - नोकरी करणार्‍या लोकांसाठी वेळ फारच चांगला असून बढतीचे योग आहे. व्यापार व्यवसायात अनुकूल स्थिती राहील. राज्यपक्षाकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. पारिवारिक प्रकरणात विचार करून काम करावे. शत्रुपक्ष प्रभावहीन ठरतील.  विद्यार्थी वर्गासाठी स्थिती सुखद राहणार आहे. या महिन्यात प्रवास घडेल. स्थावराची कामे होतील. अभ्यासात यश मिळेल. विपरीत घटनेतून लाभ होण्याची शक्यता आहे. खर्च वाढणार आहे. अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे वाहन सावधगिरीने चालवा.
सिंह
जानेवारी - वेळेचा सदुपयोग करून तुम्ही आपल्या कामात अनुकूल स्थिति मिळवाल. भाग्याचा साथ मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न राहणार आहे. पारिवारिक बाबींवर खर्च होण्याची शक्यता आहे, तसेच महत्त्वपूर्ण कार्य होतील. संतानं पक्षाचा साथ मिळेल. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. शिक्षणात जास्त परिश्रम करावे लागणार आहे. उत्तरार्धात कामे यशस्वी होतील. विवाह जुळतील. पोटाची तक्रार राहील. वैवाहिक जीवनात त्रास संभवतो. अवास्तव खर्च होतील. 
 
कन्या
जानेवारी- तुमचे काम तुमच्या द्वारेच पूर्ण होतील म्हणून निष्काळजीपणा करू नका. पारिवारिक प्रकरणात संमिश्र स्थिती राहणार आहे. भाग्याचा साथ मिळाल्याने जनतेशी संबंधित कामांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहणार आहे, शुभ वार्ता कानी पडल्याने प्रसन्नता मिळेल. शिक्षणाला भाग्याची जोड लाभेल. हौसमौज करू शकाल. अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. विवाह जुळतील. धार्मिक कृत्ये कराल. जोखीम पत्करू नका. पूर्वार्ध खर्चाचा राहणार आहे. 
 
तूळ 
जानेवारी - पारिवारिक बाबींमध्ये महत्त्वाचे काम होतील. जमिनीशी निगडित काम होतील. नोकरी करणार्‍या लोकांनी गुप्त नीतीवर चालूनच यश मिळवणे उत्तम. पराक्रमात वाढ होईल. आरोग्य उत्तम राहणार आहे, तसेच मित्रांचा साथ मिळेल. महत्त्वाकांक्षी, आशावादी, प्रयत्नवादी राहाल. निवडणुकीत यश मिळेल. उत्तरार्धात खर्च वाढेल. गृहचिंता राहील. विवाह जुळू शकतील. परदेशगमनाची संधी येईल. 
 
वृश्चिक
जानेवारी- यात्रेचे योग आहे, जे लाभदायक असेल. आरोग्याच्या दृष्टीने वेळ उत्तम राहणार आहे, तसेच शत्रू वर्गावर तुमचा प्रभाव कायम राहील. धन कुटुंबाच्या प्रकरणात संमिश्र स्थिती राहणार आहे. पारिवारिक सहयोग मिळाल्यामुळे प्रसन्नता राहणार आहे. विद्यार्थी वर्गाला सुखद परिस्थिती मिळेल. विकासासाठी नवीन उपाययोजना कराल. महत्त्वाकांक्षा वाढेल. मनमानी कराल. कौटुंबिक समस्या पूर्वार्धात जाणवतील. परदेशगमनाची संधी लाभेल. गाफील राहू नका. 
धनू
जानेवारी- भाग्याचा साथ मिळाल्यामुळे तुमचे काम प्रगतीवर राहणार आहे. आरोग्याच्या बाबतीत वेळ अनुकूल आहे. पराक्रमात वाढ होऊन शत्रू वर्ग प्रभावहीन होतील. बाहेरच्या व्यक्तींच्या संपर्कात आल्याने लाभदायक स्थिती बनणार आहे. प्रवासाचे योग घडून येतील. राजनैतिक व्यक्ती देखील सुखद स्थिती असतील. हा पूर्ण महिना तुम्ही प्रयत्नवादी राहणार आहे. तुम्हाला नवीन कल्पना सुचतील. विवाह जुळण्याचे योग देखील आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवणे फारच गरजेचे आहे. बोलताना जिभेवर संयम ठेवा. इतरांना दुखवू नका. पूर्वार्धात अनेक प्रकारचे लाभ मिळतील.
 
मकर
जानेवारी- प्रभावात वाढ होईल, तसेच विचार केलेल्या कामांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहणार असून मानसिक सुख-शांती मिळेल. पारिवारिक बाबींमध्ये सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात सुखद स्थिती राहील. नोकरी करणार्‍या व्यक्तींना फायदा मिळेल. महिन्याच्या शेवटी व्यवसायात चैतन्य आणाल. अनेक प्रकारांचे लाभ मिळतील. या महिन्यात अधिकार वाढतील पण कामाचा दर्जा कमी होईल. कौटुंबिक समस्या राहणार आहे. नेत्रविकार जाणवेल.
 
कुंभ
जानेवारी- पराक्रमात वाढ होईल, शत्रू वर्गावर प्रभाव वाढेल. व्यापार व्यवसायाची स्थिती उत्तम राहणार आहे. मानसिक सुख शांतीचे वातावरण राहणार आहे. नोकरी करणार्‍या व्यक्तींसाठी सुखद वातावरण राहील. आर्थिक प्रकरणात थोडे सावधगिरीने चालावे लागणार आहे. पूर्वार्धात अपेक्षेप्रमाणे लाभ मिळतील पण उत्तरार्धात खर्च वाढणार आहे. परदेशगमन घडेल. प्रतिष्ठा सांभाळणे फारच गरजेचे आहे. विवाह जुळतील. कर्तव्यतत्पर राहाल. या महिन्यात नवा दर्जा कीर्ती मिळेल. 
 
मीन
जानेवारी - परिश्रम जास्त केल्याने उत्तम यश मिळेल. व्यापार व्यवसायात कुठले निर्णय घेण्यास घाईगडबड करू नका. नोकरी करणार्‍या व्यक्तींसाठी हा महिना साधारण राहणार आहे. पारिवारिक बाबींमध्ये संमिश्र स्थिती राहणार आहे. बाहेर जाण्याचा योग बनेल. या महिन्यात अनेक प्रकारचे लाभ मिळतील. पाहुण्यांची ये जा वाढेल. पूर्वार्धात धंद्यात संघर्ष, पण धंदा चालेल. वाहन जपून चालवा. उत्तरार्धात बक्षिसे मिळवाल. अतिआत्मविश्वास राहील.