Dharma Sangrah

सप्टेंबर ( 2018 ) महिन्यातील भविष्यफल

Updated: गुरूवार, 30 ऑगस्ट 2018 (17:20 IST)
 
कर्क
उत्साह देणारा काळ राहिल. लहान सहान गोष्टीत अडकून राहू नका. परिस्थितीचा अभ्यास करूनच पुढे पाऊल टाका. मनातील इच्छा पूर्ण होतील. अनुभवाचा फायदा होईल. व्यापार, व्यवसायातील आवक साधारण राहिल. खर्च वाढेल. प्रॉपर्टी, खरेदी, विक्रीचे व्यवहार करताना सावध रहा. मनातील कोलाहल जिभेवर येऊ देऊ नका. मनावर रागावर संयम ठेवा. आपण काय बोलतोय याकडे लक्ष द्या. एखाद्याचे मन दुखवेल असे वक्तव्य करणे महागात पडेल.
 
सिंह
समस्याच्या मालिकांना तोंड द्यावे लागणार आहे. आर्थिक प्रकरणात मोठे नुकसान होण्याची शक्यता दर्शविते. आरोग्यविषयी चिंता सतावेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होण्याची शक्यता संभवते. पत्नी व संततीपासून दु:ख होण्याची शक्यता संभवते. व्यापार-व्यवसाय सामान्य राहिल. विरोधकांना कमजोर समजण्याची चूक करू नका. महत्त्वरची कामे रखडतील. मानसिक क्रोध, चिडचिडपणावर नियंत्रण ठेवणे भाग पडेल. नवीन रोग जडतील. व्यसनांपासून दूर रहा. मानसिक अस्वस्थता कायम राहिल. आपल्या निर्णयावर ठाम रहा. तुमच्यातील सहनशिलता या महिन्यात फायद्याची ठरेल. 
 
कन्या 
प्रगतीचा आलेख उंचावून समाधान लाभेल. आशाच्या मदतीने निराशा हळूहळू कमी‍ होईल. पुढे जाण्‍याच्या संधी मिळतील. संबंध सुधारतील. विरोधीक, शत्रुपक्ष थंड पडतील. अचूक निर्णय घेऊ शकाल. चुकीची जाणीव होईल. नव विचार, उत्साह प्रगती साधण्यास फायदेशीर ठरेल. व्यापार, व्यवसायात प्रगती साधाल. आर्थिक व्यवहार करताना त्यात पारदर्शकता ठेवा. व्यक्तीगत स्वार्थापासून दूर रहाण्‍याचा प्रयत्न करा. प्रवास योग संभावतो.
 
तूळ 
प्रगती मिळवून देणारा काळ आहे. अथक परिश्रम घ्यावे लागतील. महत्त्वाच्या कामात कोणावर विश्वास ठेवू नका. आळस टाळा. कुटूंबात वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कार्यात, यश, प्रतिष्ठा मिळेल. किमती वस्तू खरेदी करू शकाल. नोकरी, रोजगार बदलता येईल. स्वत:चे विचार इतरांसमोर न मांडता ते गुप्त ठेवणे, एखाद्या घटनेचा धुर्तपणे विचार करणे अशा काही सवयीही या राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. या राशीच्या व्यक्तींच्या विचारात सातत्याने बदल होत असतात.
 
वृश्चिक 
वेळेच भान ठेवावे लागेल. शांती, सहयोग, समाधानाने कार्य करावे लागेल. व्यापार-व्यवसाय नुकसान संभवते. गणपती बनवायला जात तर तेथे हनुमान बनेल, अर्थात कामे बिगडण्याची शक्यता आहे. जुनी वाद वाढण्याची शक्यता आहे. खरेदी, विक्रीचे व्यवहार सांभाळून करा. विरोधक वाढतील. स्वभावावर नियंत्रण राखावे लागले. कायद्याच्या चौकटीत राहून कामे करावे लागतील. स्वातंत्र्य, न्याय, आणि स्वत:चाच निर्णय योग्य वाटत असल्याने इतर व्यक्तींशी जुळवून घेण्‍यात यांना अडचण येते.
 
धनू 
अधिक उताविळपणा करू नका. तुमच्या विषयी असंतोष पसरेल. चिंता वाढेल. विचार कराल काही व होणार दुसरेच. व्यापारातील स्पर्धा टाळा. कर्ज काढू नका. खरेदी विक्रीच्या व्यवहारापासून सावध रहा. कटु अनुभव येणाचा संभव आहे. नुकसान झाले तर स्वत:चा तोल जाण्‍याची शक्यता नाकारारता येत नाही. कष्ट करावेच लागणार असल्याने आळस टाळा. व्यापार, नौकरीत फायदा मिळेल. आर्थिक योग चांगले आहेत.
 
मकर 
प्रगतीचा आलेख कासवगतीने वर चढेल. आवक चांगली होणार असल्याने खरेदी करू शकाल. मात्र व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी लागेल. कुटुंबातील वाद मिटतील. व्यापार-व्यवसायात यश येईल. नोकरीत मानाचे पद संभवते. स्वभावावाला औषध नाही असे म्हणातात पंरतू ते तुम्हाला शोधावे लागणार आहे. या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. मन प्रसन्न होईल. अनेक संकटं येतील, पण त्यातून आपोआपच सुटका होण्‍याची शक्यता आहे.
 
कुंभ  
अनुभव उपयोगी पडेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रगतीचा आलेख उंचावेल. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. इच्छा पूर्ण होतील. व्यापार व्यवसायात यश मिळेल. आवक चांगली राहिल्याने गुंतवणूक करू शकाल. नोकरीत प्रमोशन मिळेल. कुटुंबात शुभ कार्य होईल. किमती वस्तू खरेदी करू शकाल. साहित्यिकांसाठी हा महिना उत्तम आहे. करार किंवा कायदेविषयक बाबींमध्ये सतर्क रहा. राजकारणात प्रवेश करण्‍याचा विचार मनात घोळ घालेल, परंतु जरा विचार करुन निर्णय घ्या. 
 
मीन 
पूर्वी घेतलेल्या परिश्रमाचे फळ मिळेल. विरोधक अडचणी निर्माण करतील. कामाशी काम ठेवा. नवीन परिचय लाभप्रद. व्यापारातील अडचणी दूर होतील. नोकरीत बढतीचे योग. आवक वाढल्याने किमती वस्तुची खरेदी करू शकाल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहिल.  सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मान-सम्मान मिळेल. मेहनत करणार्‍यांना या महिन्यात योग्य तो मोबदला मिळेल. कोर्टाची पायरी चढण्‍याची पाळी आलीच तर काळजी करु नका. यातून कायमची सुटका होईल.

सर्व पहा

Jyeshtha Gauri 2026 ज्येष्ठा गौरी आवाहन; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि या तीन दिवसांमागची कथा

मोदक पायसम खीर: पारंपरिक आणि चवदार दक्षिण भारतीय फ्युजन रेसिपी Modak Payasam Kheer

अनंत चतुर्दशी २०२६ कधी आहे? या दिवशी अनंत सूत्र बांधण्याची परंपरा आहे, या १४ गाठी कशाचे प्रतीक?

Santan Saptami 2026 १८ सप्टेंबर रोजी संतान सप्तमी, पूजा पद्धत, नियम आणि व्रताची कथा

दुकानातील मिठाई आणणे टाळा! घरीच बेसन वापरून १० मिनिटात मोतीचूर लाडू बनवा

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments