रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2018
Written By

धनू राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल

या वर्षाच्या राशी भविष्यानुसार तुम्हाला नवीन वर्षात खूप काहीतरी करायचे आहे या भावनेतून तुम्ही तुमच्या नजरेसमोर मोठे उद्दिष्ट ठेवा आणि, आयुष्यात प्रगती करण्याच्या अनेक संधी या वर्षात तुम्हाला प्राप्त होतील. हे वर्ष परिपूर्ण आणि फलदायी राहण्याच्या दृष्टीने तुमचा जिद्द उच्च कोटीची असेल. सध्या शनीचे भ्रमण तुमच्या राशीमधून चालू आहे. साडेसातीचा मध्य आहे. त्यामुळे प्रगतीची वाढ खडतर असेल पण कर्मधर्म संयोगाने मंगळ, गुरू आणि शुक्र या तीन ग्रहांकडून तुम्हाला चांगली साथ मिळणार असल्यामुळे घाबरून जाण्याचे काम नाही. प्रयत्नांती परमेश्वर या म्हणीनुसार विश्वास ठेवून तुमचे प्रयत्न चालू ठेवा. 
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी....
मार्च महिन्यापर्यंत उत्पन्नाचा ओघ वाढता राहील. त्यानंतर मे महिन्यापर्यंत तुमच्या खर्चात वाढ होईल, पण त्यानंतरच्या उर्वरित वर्षात तुमची गाडी पुन्हा रुळावर येईल. त्यामुळे आर्थिक बाबतीत काळजी करण्याचे कारण नाही. व्यापार उद्योगात वर्षाची सुरुवात चांगली होईल. तुम्ही पूर्वी केलेल्या कामाचे पैसे मिळाल्याने तुमची काही जुनी देणी असतील तर ती तुम्ही फेडू शकाल. नवीन प्रकल्प हाती घेण्यापूर्वी त्यातील बारकाव्यांकडे नीट नजर ठेवा. उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यावर तुम्ही लक्ष केंद्रित कराल आणि तुम्ही एकापेक्षा अधिक स्रोतांमधून उत्पन्न मिळवाल. तुम्ही कष्ट करावे यासाठी शनी तुम्हाला तयार करेल. पण कामात स्वत:ला बुडवून घेऊ नका, कारण त्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट ते पुढील डिसेंबरापर्यंत काही जणांना विशेष अधिकार आणि परदेशी जाण्याची संधी मिळेल. एकंदरीत या वर्षात घाबरून जाण्याचे काम नाही. फक्त आपली लक्ष्मणरेषा ओलांडू नका. 
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...
गृहसौख्य व आरोग्यमान...
मार्च ते मे हा कालावधी काहीसा निराशावादी असेल आणि ऑक्टोबरनंतर काही आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने मात्र वर्ष फारसे सौख्यकारक नाही. राशीमधला शनी तुम्हाला नैतिक जबाबदार्‍यांमध्ये जखडून ठेवेल. अपेक्षित आणि निपेक्षित कारणांमुळे खर्च उद्भवल्याने तुम्ही थोडेसे गांगरून जाल. काही वेळा पैशाने सर्व गोष्टी मिळत नाहीत याची जाणीव होईल. वाहन जपून चालवा. मुले कष्ट करतील आणि विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली राहील. काही अपवाद वगळता कौटुंबिक आयुष्य चांगले आणि शांततामय राहील. पण तुम्ही अलिप्त राहू नये किंवा कौटुंबिक आयुष्याबाबत असमाधानी राहू नये आणि अपशब्द उच्चारू नयेत. वैवाहिक आयुष्यात चांगले परिणाम पाहायला मिळतील पण तुमच्या जोडीदाराच्या प्रकृतीच्या कुरबुरी सुरू राहतील. तुमच्या प्रेमाचे नाते अधिक घट्ट होईल. विरोधकांवर वर्चस्व गाजवाल. एकूण, हे वर्ष तुमच्यासाठी चांगले राहील, आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कलाकार, खेळाडू व धार्मिक क्षेत्राशी निगडित व्यक्तींना उसंत मिळणार नाही इतके वर्ष चांगले आहे.