बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (15:16 IST)

कन्या राशी भविष्यफल 2019

कन्या राशीच्या 2019 सालच्या भविष्यानुसार या वर्षाच्या सुरुवातीला शनि – धनु राशि, गुरु – वृश्चिक राशि आणि राहु 6 मार्च, 2019 मध्ये  मिथुन राशित असेल. तर केतु धनु राशि, गुरु राशि परिवर्तन करून 30 मार्चला धनु राशि आणि 25 एप्रिलला वृश्चिक राशित गोचर करून 5 नोव्हेंबर ला परत धनु राशित गोचर करेल. हे 10 एप्रिलला वक्री होवून शनि 30 एप्रिलला वक्री होवून 18 सप्टेम्बरला मार्गी होतील. गुरुसारखा प्रभावी ग्रह तृतीयस्थानात वर्षभर भ्रमण करणार असल्याने तुमचा उत्साह आणि आशावाद येत्या वर्षात वाढत जाश्रल. त्यात मंगळही भर टाकेल. शनी मात्र चतुर्थात असल्यनाने नवीन वर्षात सुखदु:खाचा वाटा समसमान राहणार आहे.
 
कौटुंबिक जीवन
कौटुंबिक जीवन सामान्‍य राहील. दररोज कसल्या तरी अडचणी येतील. मतभेद होतील परंतु जास्त काळजी करण्याची गरज नही. हळू हळू सगळे काही व्यवस्थित होईल. त्या मुळे जास्त घाबरण्याची गरज नाही. गुरु आणि शनिच्या दशेचा सामना करत असणाऱ्या लोकांचे वैवाहिक जीवन शुभ असेल. गुरु ग्रह आपला चागला प्रभाव दर्शवणार आहे. राहू आणि केतुच्या दशेत थोड्या अडचणी येतील. वैवाहिक जीवन एडजस्‍ट करण्यात तुम्ही 
असफळ व्हाल त्या मुळे तुमचे मन कावरे बावरे होईल. 
 
आरोग्य
तुमच्या आरोग्याच्या बाबतीत चढ-उतार सुरू राहतील. त्याचप्रमाणे आरोग्याबाबत संमिश्रण परिणाम पाहायला मिळतील. उदा. आरोग्य सुदृढ होण्याबरोबरच प्रकृतीच्या तक्रारींचा त्रास होईल. आरोग्या बाबत जास्त काळजी करण्याची गरज नाही. श्वासाबाबत थोडे त्रास होतील जास्त काळजी करण्याची अजिबात गरज नाही. ज्येष्ठांना प्रकृतीची उत्तम साथ मिळेल. पाण्यापासून, संसर्गजन्य आजारापासून दूर राहावे यासाठी शक्यतो बाहेरचे खाणे जरूर टाळावे, आरोग्य सांभाळावे.  
 
करियर
करिअरमध्येही संमिश्र परिणाम पाहायला मिळतील. या विभागात अनेक संधी मिळतील, पण त्या संधींमध्ये बहुधा अपेक्षाभंगाला सामोरे जावे लागेल. या उलट अशा अनेक संधी मिळतील, जिथे तुम्हाला यशाची चव चाखायला मिळेल. मार्च महिन्या नंतर करियर बाबत त्रास उत्पन्न होतील. नोकरी सोडण्याची वेळ येईल. स्‍थान परिवर्तन करण्याचे योग बनत आहेत. शहर बदलावे लागेल. चांगली नोकरी मिळण्याची देखील प्रबळ संभावना आहे. सीनियर्सचा साथ मिळेल आणि आपल्या द्वारे केल्या गेलेल्या कष्टाच फळ मिळेल. टीम लीडर किंवा मेंटर बनण्याची संधी मिळेल. कला, उद्योग धंद्यात खूप चांगले प्रोत्साहन लाभेल. जागोजागी मदतीचे हात माणुसकीचे दर्शन घडवील. 
 
व्यवसाय 
आर्थिक दृष्टीने वर्ष चांगले आहे. मार्च पर्यंत व्यापारात सर्व काही उत्तम असेल व त्या नंतर ही सगळ काही व्यवस्थित असेल जास्त काळजी करण्याची गरज नाही. व्यापारात खूप चांगले होणार आहे. केतु आणि शनिच्या दशेचा सामना करत असणाऱ्या लोकांना थोड सावध राहण्याची गरज आहे बाकी लोकां साठी हे वर्ष खूप चांगले असणार आहे. या वर्षी तुमची आर्थिक स्थिति सामान्‍य राहणार आहे. पैशे मिळतील. पैशा पाण्या बाबत त्रास होणार नाहीत. गुंतवणूक केल्यानी लाभ होईल. या वर्षी कुठला गुंतवणूक केल्यानी चांगला लाभ होण्याची संभावना आहे. 
 
रोमांस
या वर्षी प्रेमाच्या बाबतीत तुम्ही अनलकी असू शकताल. कुठल्या नात्याचा अंत होण्याची संभावना आहे. संशया मुळे तुमचे नाते तुटण्याची संभावना आहे. आपले नाते टिकवून ठेवण्या साठी आपल्या जोडीदारा वर विश्वास ठेवावा नाही तर तुम्ही काहीही करू शकणार नाही. तरुणांनी याच दरम्यान विवाहेच निर्णय घ्यावेत. नंतर हे निर्णय पुढील वर्षाअखेरीपर्यंत लांबतील. तुम्हाला तुमच्या शृंगारिक आयुष्यात काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. 
 
उपाय
विष्‍णु सहस्‍त्रनाम स्‍तोत्राच पठन करणे लाभकारी आहे. ध्‍यान करावे आणि सकाळी सैर करावी सगळ काही चांगले होईल.