रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: शनिवार, 11 जानेवारी 2020 (15:34 IST)

मकर राशीचे 2020 मधील टेरो कार्ड द्वारे भविष्य जाणून घेऊया

मकर कार्ड - Ace of पेन्टॅकल्स
मकर राशीच्या लोकांसाठी वर्ष 2020 खूप खास असणार आहे. हे वर्ष आपणांस विस्मरणीय ठरणार आहे. भूतकाळातील झालेल्या नुकसानाची भरपाई ह्या वर्षी होणार आहे. एकंदरीत हे वर्ष आपल्यासाठी खूप चांगले जाणार आहे. यंदा आपले उत्पन्न वाढतील. प्रेम प्रकरणांपासून लांब राहा. आपणांस मनस्ताप होऊ शकतो. आपण करियरमध्ये चांगले काम कराल. आपण एखादा व्यवसाय सुरू करू शकता. त्यात आपल्याला फायदा होईल. कुटुंबाशी सुसंवाद साधा. अन्यथा नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. कामाच्या ताणांमुळे आजारी होऊ शकता. खाण्याचे पथ्य पाळा. जंक फूड खाऊ नका. अविवाहितांचे विवाह होतील. प्रेम संबंध असल्यास नात्यांमध्ये विभक्ती होऊ शकते. करियर आणि व्यवसायात चांगल्या कारकीर्दीमुळे आर्थिक लाभ होतील. खर्चांवर आळा घाला.
 
करियर :- आपल्याला बढती मिळण्याचे योग आहे. आपण नव्या संघाचे नेतृत्व कराल. ग्राहकांची आपल्यावर मर्जी राहील. त्यांना आपले काम आवडतील. आपले कौतुक होईल. आशावादी राहा. 
 
व्यवसाय :- आपण नवे व्यवसाय सुरू कराल. त्यात यशस्वी व्हाल. व्यवसाया मुळे प्रतिष्ठा मिळेल. ओळखीने लाभ होतील. नव्या संपर्काने शिकाल.
 
कुटुंब :- कौटुंबिकरीत्या काळजी घ्या. सुसंवाद साधा. गैरसमज होऊ शकतात. त्याचा परिणाम आपल्यावर पडेल. हळू हळू सगळे ठीक होईल. धैर्य ठेवा. काळजी नसावी.
 
आरोग्य :- खाण्यापिण्याची पथ्ये सांभाळा. बाहेरचे खाऊन आजारी पडू शकता. पोटाचे आणि पचनतंत्राचे विकार उद्भवतील. हंड्यांचे दुखणे त्रास देतील.
 
प्रेम आणि वैवाहिक जीवन :- अविवाहितांचे विवाह जुळतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेम संबंधात मित्रांमुळे दुरावा संभवतो. 
 
आर्थिक स्थिती :- यंदा नशिबाची साथ आपणांस मिळत आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. पैशांची आवक चांगली राहील. गुंतवणूक करण्याआधी योग्य विचार करा. आपण आपले सर्व उद्दिष्टे पूर्ण कराल.   
 
टीप :- शनीचे नकारात्मक परिणाम दूर करण्यासाठी सरसोंच्या तेलात मीठ घालून 21 दिवस अंघोळ करा.