बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: शनिवार, 11 जानेवारी 2020 (14:43 IST)

मिथुन राशीचे 2020 मधील टेरो कार्ड द्वारे भविष्य जाणून घेऊया

मिथुन : कार्ड - Seven of Swords 
2020 वर्ष मिथुनराशी साठी संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवून देईल. हे वर्ष आपणांस एक उत्तम सामाजिक व्यक्ती म्हणून यश मिळवून देईल. आपले मित्र आपले उत्तम मार्गदर्शन करतील. कामामध्ये चांगली कारकीर्दी कराल. आपल्यावर जबाबदाऱ्या येतील. जे आपण उत्तमरीत्या निभवाल. आपल्या सहकार्‍यांशी सलोख्याने वागा. व्यवसायात आपणांस यश मिळेल. आपण नवीन व्यवहार कराल. कुटुंबात काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्याचे तणाव आपणांस होईल. पण हे तात्पुरते असल्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. अन्यथा त्याचा परिणाम आपल्या आरोग्यांवर होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. धूम्रपानासारख्या सवयींवर आळा घाला. फिटनेस प्लांनिंग करा. जुनी कर्जे निवळतील. नवे संबंध होतील.

कॅरियर :- आपण आपल्या कॅरियर मध्ये प्रगती कराल. आपण आपल्या मित्रांसाठी प्रेरणास्रोत असाल. आपल्या कामासाठी आपणांस पुरस्कृत केले जाऊ शकते. आपण गरजूंना उत्तम मार्गदर्शक असाल.
 
व्यवसाय :- व्यवसाय संबंधित नवे करार कराल. नवे व्यवसाय आपणांस अनुकूल असतील. व्यवसायाच्या दृष्टीने हे वर्ष फायदेशील ठरेल. आपल्या सहकाऱ्यांवर लक्ष ठेवा तसेच आर्थिक गोष्टींवर देखील लक्ष ठेवा.
 
कुटुंब :- आपल्या कुटुंबात गैरसमजाची स्थिती असू शकते. काही प्रकरणांमध्ये, विवादाची परिस्थिती उद्भवेल. सरत्या वर्षात स्थिती निवळेल. आपल्या कुटुंबाचा सल्ला घ्या. त्यांचा सोबत सहलीच्या योजना आखाल.
 
आरोग्य :- छोट्या छोट्या गोष्टी वरून आपणांस ताण येऊ शकतो. सकारात्मक राहा. ज्याने आपण निरोगी राहाल. कारण हे आपल्याला तंदुरुस्त ठेवते. आरोग्याची काळजी घ्या. डॉक्टर कडे नियमित तपासणीला जा. प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाने फिटनेस योजना सुरू करा.
 
प्रेम आणि विवाह :- ह्या वर्षी जुने प्रेम संबंध पुन्हा सुरू होऊ शकतात. जुने नाते नव्याने उभारी घेतील. विवाहितांसाठी हे वर्ष प्रत्येक क्षणाचा आनंद घेता जाईल. विवाहितांचे नाते बहरतील.
 
आर्थिक स्थिती :- ह्या वर्षी आपल्या कर्जाची परतफेड होईल. आर्थिक नियोजन केल्याने आपणांस नफा मिळेल. आर्थिक प्रगती होईल. पैशाची चणचण कमी होईल. त्या मुळे आपण तणावमुक्त होऊ शकता.
 
टिप :- दररोज सैंधव मिठाने घर पुसून काढा. 
संरक्षणासाठी घराच्या प्रवेश दारावर चक्र लावा. व्यवसायात प्रगतीसाठी कार्यस्थळी ड्रॅगन ठेवा.