सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: शनिवार, 21 डिसेंबर 2019 (13:31 IST)

Numerology Prediction 2020 मूलांक 1 साठी अंक ज्योतिष

मूलांक 1 चा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि म्हणूनच ह्या मूलकांच्या लोकांची ऊर्जा अफाट असते. ह्या मूलकांच्या लोकांना शाही जीवन जगणे आवडते. अंक शास्त्र 2020 नुसार ह्या वर्षी मूलांक 1 असणार्‍यांसाठी हे वर्ष चांगले असेल. नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात हे लोक या वर्षी उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. कार्यक्षेत्रात यश मिळू शकतं. आपले विचार आपल्याला पुढे जाण्यास मदत करतील आणि उच्च अधिकाऱ्यांशी असलेले आपले चांगले संबंध आपल्याला चांगले परिणाम देतील. 
 
हे वर्ष आपल्यात ऊर्जा निर्माण करते आणि या वर्षी आपण स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकाल. विद्यार्थी या वर्षी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट  कामगिरी बजावतील, जर शासकीय सेवेची तयारी करत असतील तर त्याचे परिणाम निश्चित यशस्वी येतील. आपण एकाग्रतेने आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
 
अंक शास्त्रानुसार, या वर्षी आपल्या वैवाहिक जीवनात थोडा ताण सहन करावा लागू शकतो आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होऊ शकतो, म्हणून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे आणि आपल्या आणि जोडीदारामधील तणाव दूर करण्याचे प्रयत्न करावे. तणावात असल्यावर वाहने चालवू नका. आव्हानांपासून मुक्त राहा अन्यथा परिस्थिती अजून बिघडण्याची शक्यता आहे. जोडीदाराला त्याचा कार्य क्षेत्रात बढती मिळेल.