बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: शनिवार, 21 डिसेंबर 2019 (11:30 IST)

Money Horoscope आर्थिक राशिभविष्य: कन्या

ह्या राशीचे राशिफळ चांगले आहे कारण या काळात सतत पैशांचा प्रवाह सुरू असेल. पैशाची आवक जाणवेल आणि आपले आर्थिक जीवन प्रगत होईल. यावेळी आपण नवीन वाहन, घर खरेदी करू शकता. अडकलेला पैसे परत मिळेल. 
 
हे वर्ष व्यवसायात गुंतवणुकींसाठी खूप फायदेशीर आहे. अचानक नफा देखील मिळू शकेल. एप्रिल ते जुलैचा काळात शेअर बाजार, जुगार, सट्टेबाजी आणि सट्टा व्यवसायाकडून चांगले उत्पन्न मिळू शकते. कुठेही गुंतवणूक करताना विचारपूस करूनच गुंतवणूक करा.
 
आपण आपले वित्त अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यास सक्षम असाल. ह्या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात आपण आपले उत्पन्न वाढविण्यास सक्षम असाल आणि आपण चांगले पैसे कमावू शकाल आणि उत्तरार्धात गुंतवणुकीचा विचार कराल आणि त्यामध्ये चांगला फायदा होईल. 
 
ह्या वर्षाच्या कालावधीत आपण आपले पैसे आणि गुंतवणुकींबद्दल खूप सावध राहाल, ज्यामुळे आपल्याला चांगला नफा मिळेल. आपल्या खर्चाची तपासणी करा आणि तपासणी केल्यानंतर नियमितपणे पैशांचे व्यवहार करा जेणेकरून कोणतीही अडचण उद्भवू नये. ह्या वर्षी आपण बचत कराल. नातलग व मित्रांना पैशाने सहकार्य कराल.