बुधवार, 5 नोव्हेंबर 2025
  1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. बाबा आमटे
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 डिसेंबर 2014 (12:50 IST)

व्यक्तीविशेष : बाबा आमटे

baba amte
थोर समाजसेवक बाबा आमटे उर्फ मुरलीधर देवीदास आमटे यांचा जन्म हिंगणघाट येथे 26 डिसेंबर 1914 रोजी झाला. कुष्ठरोग्यांच्या शुश्रुषेसाठी त्यांनी चंद्रपूर येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. घरच्या सुबत्तेमुळे त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांचे   महाविद्यालीन शिक्षण नागपूर येथे झाले. स्वत: डॉक्टर होऊन समाजाची सेवा करावी, असे त्यांचे विचार होते. परंतु वडिलांच्या आग्रहास्तव ते वकील झाले. काहीकाळ त्यांनी  वकिली केली. 1949-50 या कालावधीत त्यांनी कुष्ठरोगविषयक अभ्यासक्रम पूर्ण केला. तत्कालीन समाजात कुष्ठरोग हे मागील जन्माच्या पापाचे फळ समजले जाई. त्यांना  वाळीत टाकले जाई. एकदा एक पावसात कुडकुडणारा कुष्ठरोगी बाबांनी पाहिला. त्याला त्यांनी घरी आणले. बाबांचे आनंदवन 3500 कुष्ठरोग्यांचे घर बनले. कुष्ठरोग्यांची सेवा केली व त्यांना आत्मनिर्भर बनविले. त्यांना पद्मश्रीशिवाय अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळाले. 
 
महात्मा गांधींनी त्यांना ‘अभय साधक’ संबोधले. मानवतेच्या या महान सेवकाचे 9 फेब्रुवारी 2008 मध्ये निधन झाले.