बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

एलोवेराने करा सनबर्न स्किनचे ट्रीटमेंट

बर्‍याच लोकांना सनबर्नचा त्रास असतो. खरं तर भारतात ही समस्या फारच सामान्य आहे. येथे प्रत्येक व्यक्तीला सनबर्नच्या समस्येला तोंड द्यावे लागते.  
 
सनबर्नला रोखण्याचा एकमात्र उपाय असा आहे की घराबाहेर पडू नका. आणि असे करणे कुणासाठीच शक्य नसते. म्हणून आम्ही तुम्हाला एलोविराशी बनलेले या होममेड फेस पॅकची माहिती देत आहोत ज्याने तुम्ही सनबर्नचा उपचार घरीच करू शकाल.  
 
एलोविरा एक अद्भुत पौधा आहे. या झाडातून निघणारे जेलचा वापर औषध आणि कॉस्मेटिक्समध्ये करण्यात येतो. हे एक थंड जेल आहे 
 
ज्याचा वापर त्वचेशी निगडित समस्या जसे रेषेस आणि खाज इत्यादी उपचारांवर केला जातो. तर या गोष्टीत कुठलेही आश्चर्य नाही की याचा वापर सनबर्नच्या उपचारासाठी केला जातो. तर आम्ही सांगत आहो की या फेस पॅकला घरी कसे बनवू शकता.   
 
साहित्य : एलोविरा जेल, दही, खीरा (काकडी) 
 
विधी तथा उपयोग: एलोविराच्या दोन पानांमधून सावधगिरीने जेल काढावे. याला चमच्याने व्यवस्थितपणे मिक्स करावे ज्याने जेल एकसारखे होईल.    
 
यात दोन चमचे दही मिसळा. एक काकडी किसून त्याला जेल व दह्याच्या मिश्रणात मिसळून द्या. सर्व वस्तू चांगल्या प्रकारे मिक्स करा. 
 
सनबर्नच्या उपचारासाठी एलोविराने तयार केलेला फेस पॅक तयार आहे. या पॅकला चेहरा व हाता पायाला 10-15 मिनिट लावून नंतर थंड पाण्याने धुऊन घ्या. तुम्हाला नक्कीच सनबर्नने फायदा मिळेल. आणि तुम्ही उन्हात बिंदास जाऊ शकता.