सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

हळदीने मिळवा डागरहित उजळ त्वचा, सोपे उपाय

हळद रक्त शुद्ध करते म्हणूनच याने सुंदरता वाढते. चेहर्‍यावरील डाग जात नसल्यास हळदीचा पॅक तयार करून वापरू शकता. हळदीत आढळणारे एंटीसेप्‍टिक गुण डाग मिटवण्यात मदत करतात. पाहू हळदीचे काही गुणकारी फेस पॅक ज्याने डागही मिटतात आणि रंगही उजळतो.
हळद आणि दही: 1 चमचा हळद पावडर 1 चमचा दह्यासोबत मिक्स करा आणि ही पेस्ट चेहर्‍यावर लावा. 15 मिनिटानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. आठवड्यातून एकदा तरी हे पॅक वापरा. डाग नक्की साफ होतील.
 
हळद आणि काकडीचा रस: हळद आणि काकडीने त्वचा उजळेल. यासाठी 1 चमचा हळदीत 2 चमचे काकडीचा रस मिसळा आणि चेहर्‍यावरील डागांवर लावा. पेस्ट वाळल्यावर चेहरा धुऊन टाका. असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा.
हळद आणि लिंबाचा रस: ताज्या लिंबाच्या रसात चिमूटभर हळद मिसळा आणि जाडसर पेस्ट तयार करा. ही चेहर्‍यावर लावून 15 मिनिट राहून द्या. नंतर चेहरा धुऊन पुसून घ्या आणि मॉइस्‍चराइजर लावा.
 
हळद आणि चंदन पावडर: 1 चमचा चंदन पावडरमध्ये चिमूटभर हळद आणि जरासं मध मिसळा. चेहर्‍यावर 20 मिनटांसाठी लावून ठेवा आणि मग पाण्याने धुऊन टाका.

हळद, दूध आणि मध: 2 चमचे दूध आणि 1 चमचा मधासोबत 1 चमचा हळद मिसळा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि 15 मिनिटानंतर चेहरा धुऊन टाका. याने हळू-हळू चेहर्‍याचे सर्व डाग दूर होतील.