गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

अॅक्ने टाळण्यासाठी काय करावे...

मुलं आपल्या त्वचेच्या बाबतीत जास्त दक्ष नसतात. स्कीन केअरच्या बाबतीत त्यांचा अॅटिट्यूड 'चलता है' असाच असतो. म्हणूनच त्यांना त्वचेच्या विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यापैकी ऐक म्हणजे अॅक्ने. अॅक्ने ही मुलांमधली कॉमन समस्या आहे. आता ही समस्या दूर कशी करायची हे जाणून घेऊ या... 
* बाईक चालवताता हेल्मेट तसंच कॅप घातल्याने कपाळ आणि डोक्याच्या आसपासच्या भागावर पिंपल्स येऊ शकतात. हे टाळण्यासाठी रबिंग अल्कोहलने हेल्मेट स्वच्छ करा. तसंच कॅप नियमितपणे धुवा. 
 
* दिवसभर दोन ग्लासपेक्षा जास्त दूध प्यायल्याने अपचनाची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे पिंपल्स होऊ शकतात.
 
* चेहर्‍याला सारखा हात लावल्यानेही पिंपल्स येऊ शकतात. त्यामुळे वारंवार हात धुवा. तुमची त्वचा खूपच नाजूक असते, हे लक्षात ठेवा. 
 
* दररोज व्यायाम केलाच पाहिजे. पण यावेळी येणार्‍या घामामुळे पाठ तसंच छातीवर पिंपल्स येऊ शकतात. हे टाळण्यासाठी वर्कआउटनंतर लगेच शॉवर घ्या. अँटीबॅक्टेरियल साबण किंवा बॉडी वॉश ठेवा. जीममध्ये जास्त घट्ट कपडे घालू नका. 
 
* शेव्हिंग रेझरमुळे पिंपल्स होऊ शकतात. हे टाळण्यासाठी रेझर नीट स्वच्छ करा. येझर रबिंग अल्कोहोलमध्ये ठेऊन स्वच्छ करा.