ब्युटी टिप्स : Try This
काकडीचे गोल काप कापून डोळ्यांवर १५ मिनिटे ठेवावे, त्याने थकलेल्या डोळ्यांना आराम मिळतो. काकडी नसल्यास गुलाबपाण्याच्या पट्टयाही डोळ्यांवर ठेवता येतील.
ब्लिचिंग केल्याने रंग गोरा होत नाही, तर केवळ त्वचेवरील केसांचा रंग फिकट होण्यास मदत होते. गोरं दिसण्यासाठी वारंवार ब्लिचचा वापर करणे शक्यतो टाळावे.
हाताच्या कोपर्यांचा व गुडघ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी त्या भागावर ग्लिसरीन लावावे. त्यानंतर कोमट पाण्यात एक जाडसर कपडा भिजवून त्याने रगडावे. असे केल्याने काळेपणा दूर होतो.
काखेतील वाळलेले केस वॅक्सिंग पद्धतीने काढल्यानंतर थोडे टोनर लावावे व बर्फ फिरवून घ्यावा.
नेल ब्लिचचा वापर केल्याने डाग पडलेली नखे आणि त्यांच्या भोवतीची त्वचा मुलायम बनत जाते.
