अरे वा! घरगुती लिपस्टीक तयार करणे इतके सोपे
बाजारात मिळणारे कॉस्मेटिक महाग तर असतातच पण आपल्या स्कीनवर विपरित परिणाम टाकणारे असतात. त्यातून ओठ हे तर सर्वात नाजुक असतात, यावर रोज बाजारातील लिपस्टिक लावली तर ओठ काळे पडू लागतात. म्हणून येथे आम्ही सोपी पद्धत सांगत आहोत ज्याने आपण घरी लिपस्टिक तयार करू शकता.
साहित्य: एक बीट, 1/2 कोकोनट ऑइल, 1/2 चमचा मधमाश्यांचे मेण, 1/2 चमचा कोको बटर
कृती: बिटाचे पातळ काप करून वाळू द्या. डिहायड्रेटरमध्ये हे काप 120 डिग्रीवर 8 तास ठेवून वाळूव शकता. नंतर मिक्सरमधून वाटून पावडर तयार करा.
मंद आचेवर एका भांड्यात अर्धा ते 1 कप पाणी टाकून त्यात मेण, कोको बटर, कोकोनट ऑइल आणि बीट पावडर मिसळा. चांगले ढवळा. गडद रंगासाठी अधिक पावडर किंवा वाळलेल्या चेरीज वापरू शकता. घट्ट झाल्यावर मऊ कपड्याने गाळून घ्या. लिप कंटेनरमध्ये हे मिश्रण ओतून घ्या. थंड होऊ द्या. आपले लिपस्टिक तयार झाले. हे पूर्ण पणे नैसर्गिक असल्यामुळे ओठ काळे पडणार नाही.