रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : सोमवार, 28 मार्च 2022 (12:18 IST)

कच्चं दूध लावल्याचे फायदे जाणून घ्या

पूर्वीच्या काळात कच्चं दूध सौंदर्य वाढविण्यासाठी वापरले जात होते. आता बाजारात उपलब्ध असलेल्या सौंदर्य वाढविण्याच्या वस्तू वापरल्या जातात. या महागड्या सौंदर्य उत्पादनाचा वापर करून देखील बऱ्याच लोकांना त्वचेशी निगडित समस्या उद्भवतात. त्याचे दुष्परिणाम देखील भोगावे लागतात. हे टाळण्यासाठी कच्च्या दुधासारख्या घरगुती गोष्टी वापरून या समस्या दूर केल्या जाऊ शकतात.  
 
चेहऱ्यावर कच्चं दूध का लावावे -
कच्च्या दुधात दुग्धशर्करा, प्रथिने, चरबी, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-ए, बी -12, डी आणि झिंक आढळतात. झोपेच्या वेळी ते लावल्याने रक्ताभिसरण वाढते. परिणामी, दुधात आढळणारे पोषक त्वचेत शोषले जातात. यामुळे त्वचेचे व्यवस्थितरित्या मॉइश्चरायझेशन होते. 
 
* कच्च्या दुधात मीठ मिसळून त्याचे सेवन केल्यास फायदा होतो. हे एक चांगले स्क्रब म्हणून कार्य करते आणि ब्लॅकहेड्स काढून टाकते.
 
* कच्च्या दुधात ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि सॅच्युरेटेड फॅट असते. चेहऱ्यावर लावल्याने वाढत्या वयाचे परिणाम दिसून येत नाही. 
 
* कच्च्या दुधात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. चेहऱ्यावर ओलावा टिकून राहण्यासाठी दररोज हे लावल्याने फायदा होतो. 
 
* डोळ्यात जळजळ होत असल्यास, कच्च्या थंड दुधात कापूस भिजवून पिळून डोळ्यावर ठेवा. असं केल्याने डोळ्याची जळजळ दूर होईल. कच्च दूध ओठांना लावणे देखील फायदेशीर आहे. 
 
* कच्चं दूध टोनर म्हणून वापरू इच्छित असल्यास कापसाच्या बोळ्याने कच्चं दूध घेऊन चेहऱ्यावर लावा. क्लिन्जर म्हणून वापरण्यासाठी चेहऱ्यावर लावून हळुवार हाताने मालीश करा.