पांढरे केस दिसल्यास ते तोडण्याची चूक करू नका, या टिप्स अवलंबवा  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  आजकालच्या बदलत्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेकवेळा लोकांचे केस अगदी लहान वयातच पांढरे होऊ लागतात. याशिवाय जास्त ताण आणि खराब पाण्यामुळे वेळे आधीच डोक्यावर पांढरे केस येऊ लागतात. ही समस्या टाळण्यासाठी तरुण काही चुकीची पावले उचलतात ज्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. विशेषत: ते पांढरे केस रंगवू लागतात किंवा ते कापू लागतात.
				  													
						
																							
									  
	 
	* प्रथमच पांढरे केस दिसल्यावर काय करावे?
	पांढरे केस पाहून तणावात येण्याची अजिबात गरज नाही, काही उपाय करून आपण  या समस्येपासून सुटका मिळवू शकता. जर आपले केस वेळेआधीच पांढरे होऊ लागले असतील तर केस उपटण्याची चूक करू नका. त्यामुळे पांढरे केस आणखी वाढू शकतात. 
				  				  
	 
	* कॅफिनचे सेवन कमी करायचे?
	जेव्हा केस पांढरे होऊ लागतात तेव्हा कॅफिन असलेल्या गोष्टींचे सेवन कमी करा. याशिवाय फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असलेल्या गोष्टी खा. ग्रीन टीचा आहारात समावेश करावा. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	* मेहंदी वापरा
	पांढरे केस टाळण्यासाठी मेहंदीचा वापर करा. हे आपल्या केसांना नैसर्गिक चमक देण्याचे काम करते. ते नियमितपणे लावल्याने आपले केस चमकदार होतात.
				  																								
											
									  
	 
	* ऑइल बेस्ड रंग वापरा
	पांढऱ्या केसांना रंग दिल्याने त्यांचा नैसर्गिक रंग निघून जातो. केसांचा रंग निवडताना तेलावर आधारित केसांचा रंग असावा हे लक्षात ठेवा. या टिप्स अवलंबण्यापूर्वी, वैद्यकीय सल्ला आवर्जून घ्यावा.