डीप कंडिशनिंग पण जरा जपून
केसांची काळजी घेण्यासाठी डीप कंडिशनिंगचा पर्याय स्वीकारला जातो. यामुळे केसांना पोषण मिळतं. केस हायड्रेट होतात शिवाय त्यांचं मॉईश्चरायझेशनही होतं. डीप कंडिशनिंगमुळे केस मऊ होतात. छान चमक येते. कोरड्या केसांच्या कंडिशनिंगसाठी ऑइल किंवा वॉटर बेस्ड तर तेलकट केसांच्या कंडिशनिंगसाठी वॉटर बेस्ड उत्पादनांचा वापर करायला हवा. डीप कंडिशनिंगबाबतच्या या काही टिप्स:
केस धुवून वाळल्यानंतर लांबीच्या हिशेबाने शिया बटर घ्या आणि स्कॅल्पपासून केसांच्या टोकांपर्यंत लावा. यानंतर गरम पाण्यात टॉवेल बुडवून डोक्यावर बांधा. अर्ध्या तासाने केस धुवून घ्या.
केसांना कोरफडीचा गर लावा. जेलचा वापरही करता येईल. साधरण 20 मिनिटांनी कोमट पाण्याने केस धुवून घ्या.
दोन चमचे मधात दोन चमचे ऑलिव्ह ऑइल मिसळा. याने केसांच्या मुळांना मसाज करा. अर्ध्या तासाने धुवून टाका.
अंडयाच्या पिवळ्या भागात एक कप पाणी आणि दोन ते तीन चमचे नारळाचं तेल घाला. केसांना लावून वीस मिनिटांनी धुवून टाका.
थोड्या ओल्या केसांवर दही लावा. मोठ्या दातांच्या कंगव्याने विंचरून घ्या. अर्ध्या तासाने कोमट पाण्याने धुवून टाका. तेलकट केसांवर हा प्रयोग करा. दह्यामुळे स्कॅल्पमधून होणार्या तेलनिर्मितीला आळा बसेल. दह्यात मायोनिज मिसळता येईल.