रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017 (14:43 IST)

काय आहे मॉईश्चरायझर आणि सिरम?

बाजारात दर दोन दिवसांनी नवी स्कीन आणि हेअर केअर प्रोडक्ट्स येत असतात. या प्रोडक्ट्सच नेमकं काम काय, हेच आपल्याला कळत  नाही. 
 
मॉईश्चरायझर असो किंवा सिरम, सगळं सारखचं वाटतं. फेशियल सिरम आणि मॉईश्चरायझरबद्दलही आपला असाच गोंधळ उडतो. या दोघांमधला नेमका फरक जाणून घेऊया...
 
* मॉईश्चरायझर लोशन आणि क्रीम अशा दोन्ही प्रकारांमध्ये मिळतो. त्वचेला ओलावा टिकवून ठेवणं हे मॉईश्चरायझरमुळे त्वचा कोरडी पडत नाही. मॉईश्चरायझरमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं मिश्रण असतं. यामुळे त्वचेला ओलावा टिकून राहतो. 
 
* फेशियल सिरममुळे तुमच्या त्वचेचं पोषण होतं. सिरममुळे तुमचा चेहरा ताजा, टवटवीत आणि तरूण दिसतो. सिरममध्ये 'क' आणि 'ई' जीवनसत्व असतं. तसंच यात अँटी  ऑक्सिडंट्‍सही असतात. सिरममुळे त्वचेला ओलावा टिकून राहतो. 
 
* मॉईश्चरायझरच्या तुलनेत सिरम बरंच हलकं असतं. यात अॅक्टिव्ह म्हणजे कार्यरत घटकांची संख्या बरीच जास्त असते. यातल्या मॉलेक्युल्सचा आकार खूपच लहान असल्याने सिरम त्वचेत पटकन शोषलं जातं. यामुळे त्वचेचं अधिक चांगल्याप्रकारे पोषण होतं. 
 
* सिरममुळे त्वचेचा कोरडेपणा, पिंपल्स, सुरकुत्या पडण्यासारख्या अनेक समस्या दूर होतात. तर मॉईश्चरायझर त्वचेतला ओलावा टिकवून ठवण्याचं काम करतो. 
 
* मॉईश्चरायझरचा वापर दिवस सुरू होताना करायला हवा. तर सिरमचा वापर रात्री झोपताना करायला हवा. अधिक चांगल्या परिणामांसाठी मॉईश्चरायझरच्या आधी सिरम लावता येईल.