1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023 (14:03 IST)

दररोज डोकं धुतल्याने केस गळतात का? शाम्पू कसा निवडावा?

hair
1 अंघोळ करताना केस खूप गळतात का? त्याचे कारण काय?
केस धुतल्यानं जास्त गळतात यात तथ्य नाही. डोक्यावरून अंघोळ करताना आपल्या काही सवयींमुळं केस गळत असतात. त्याशिवाय डोक्यावरून अंघोळ करण्याचा केस जास्त गळण्याशी तसा फारसा संबंध नाही.
 
2 आठवड्यातून कितीवेळा डोक्यावरून अंघोळ करावी?
तुम्ही आठवड्यातून किती वेळा डोक्यावरून अंघोळ करावी, हे व्यक्तीनुसार बदलत असतं.
 
जर केसांच्या मुळांमध्ये खूप तेल किंवा कोंडा अधिक राहत असेल तर दर दुसऱ्या दिवशी डोक्यावरून अंघोळ करावी.
 
जे लोक व्यायाम करतात आणि खूप घाम गाळतात, त्यात खेळाडुंचा समावेश आहे. त्यांनी रोज अशी अंघोळ करायलाही हरकत नाही
 
3 पुरुषांनी किती वेळा असे स्नान करावे?
पुरुषांच्या त्वचेमध्ये असलेल्या ग्रंथी अधिक सक्रिय असतात. तेलाचा स्त्राव होत असल्याने पुरुष रोजदेखील स्नान करू शकतात.
 
4 गरम की थंड, डोक्यावरून अंघोळीसाठी कोणते पाणी उत्तम?
डोकं धुताना खूप गरम किंवा खूप थंड पाणी वापरू नये. कोमट पाण्याने अंघोळ करणे सर्वात उत्तम.
 
5 खाऱ्या पाण्याने डोके धुता येईल का?
पाण्याच्या प्रकारामुळं केस अधिक गळत नसतात. तुम्ही खाऱ्या पाण्यानं अंघोळ केली तरी त्यानंतर डोक्यावरून पिण्याच्या पाण्याची एक बाटली ओतून घ्यावी. त्यामुळं आधी वापरलेल्या पाण्यातील अशुद्धपणा किंवा खारेपणा निघून जाईल.
 
6 रोज डोके धुतल्याने केस गळती वाढते का?
खूप वेळ शॉवरखाली उभं राहू नये. कारण आपल्या केसांतून नैसर्गिकरित्या तेलाचा स्राव होत असतो. खूप काळ अंघोळ केल्यास ते बंद होईल. केसांना फक्त शॅम्पूचा फेस स्वच्छ होईपर्यंतच धुवावे.
 
7 शॅम्पू कसा निवडावा?
आपल्या त्वचेचा पीएच 5.5 (आम्लता) असतो. अशा शॅम्पूचा वापर करणं अधिक उपयोगी आहे, जो आम्लतेच्या समान स्तराच्या खूप जवळ असेल.
 
खूप जास्त आम्लता असल्यास केस कोरडे होऊ शकतात. शॅम्पूच्या पीएचबाबत बाटलीवरच माहिती दिलेली असते.
 
बहुतांश लोक आता सल्फेट आणि पॅराफिन फ्री शॅम्पूचा वापर करतात. सल्फेटचा वापर शॅम्पूमध्ये फेस तयार करण्यासाठी केला जातो.
 
काही लोकांच्या डोक्यात खूप तेल आणि घाण जमा होत असते. त्यांनी कमी सल्फेट असलेल्या शॅम्पूचा वापर करणे योग्य नाही. ते चांगल्या ब्रँड किंवा डॉक्टरांनी सुचवलेल्या शॅम्पूचा वापर करू शकतात.
 
डँड्रफ, सोरायसिस, एक्झिमा अशा समस्या असलेले लोक सल्फेट आणि पॅराफिन मुक्त शॅम्पूचा वापर करू शकतात. कारण याचा परिणाम केसाच्या मुळांवर होतो.
 
8 शॅम्पू करण्यासाठी उत्तम काय?
शॅम्पू उत्तम आहे. पण बहुतांश लोक विचार करतात की, हरभरे चांगले असतात. तर आवळ्यामुळं केस कोरडे बनतात. त्यामुळं केस चांगले धुवायला हवे. नसता त्याचे कण मुळाशी राहतात आणि आग होते.
 
9 कोणत्या प्रकारचे हेअर कंडीशनर वापरायला हवे?
कोरडे केस, तेलकट केस यानुसार व्यक्तीनं निवड करायला हवी. केस मजबूत नसतील तर कंडिशनर चा वापर न करणंच योग्य. कंडिशनर ऐवजी सीरमचा वापर करता येऊ शकतो.
 
अंघोळीनंतर एका दिवसांत केसांमध्ये 'चिकटपणा' येत असेल तर तुमचे केस तेलकट आहेत. कोरडे केस कोरडे असतात. त्यानुसारच शॅम्पू आणि कंडिशनर निवडावे.
 
10 केस कसे स्वच्छ कराल?
शॅम्पूचा वापर फक्त केसांच्या मुळंसाठीच करायला हवा. कंडिशनर केसांसाठी असते. ते मुळावर लावायला नको.
 
तुम्ही अँटि-डँड्रफ शॅम्पू किंवा डॉक्टरांनी सुचवलेला शॅम्पू वापरत असाल, तर त्याचा वापर औषधासारखा करू शकता.
 
आधी केसांच्या मुळाशी चोळून ते 5-10 मिनिटे सोडावे. सर्वाधिक वापर केले जाणारे अँटिफंगल केटोकोनाझोल किंवा सेलेनियम सल्फाइड असते.
जर त्याचा परिणाम होऊ द्यायचा असेल तर 5-10 मिनिटांसाठी तसे सोडावे. जर तो नियमित शॅम्पू असेल तर, आपण त्यानं हळू-हळू मालिश करण्यासाठी बोटांचा वापर करायला हवा.
 
11 टॉवेलचा वापर कसा करावा?
मऊ केस असलेल्यांनी तशाच मऊ टॉवेलचा वापर करावा. डोकं फार जोरानं हलवू नये. आपल्या केसांभोवती 'क्युटिकल' नावाचा पदार्थ असतो. तो खालच्या बाजुला असायला हवा, वरच्या बाजुला नव्हे. तुम्ही जेव्हा केस ब्रश करता तेव्हा 'क्युटिकल' वर होतं. त्यामुळं केस खूप जास्त विस्कटलेले दिसू लागतात.
 
केसांमधून पूर्णपणे पाणी काढून टाकायला हवे. काही महिला केस आक्रमक पद्धतीनं विंचारत असतात. त्यामुळं केस ओढले जातात आणि कमकुवत केस गळायला लागतात.
 
12 'हेअर ड्रायर'चा वापर करावा का?
केस नैसर्गिकरित्या हवेत वाळू द्या. 'हेअर ड्रायर'चा वापर करताना सेटिंग थंड हवेची ठेवावी. म्हणजे गरम हवा नसावी. ड्रायरने केस वाळवण्यात काही वाईट नाही. जर गरम हवा असेल, तर केस 'हेअर ड्रायर' पासून थोडे दूर ठेवावे.
 
केसांना फार गरम ठेवू नका. गरमीपासून बचावासाठी सीरम आणि स्प्रे उपलब्ध आहेत. केस 80-90% वाळल्यानंतर ते एका दिशेला कोरडे करावे आणि मग ड्रायरचा वापर करावा.
 
13 अंघोळीनंतर कंगव्याचा वापर करू शकतो का?
हे अत्यंत चुकीचे आहे. काही लोकांचे केस आधीच कमकुवत असतात. ओल्या केसांमध्ये कंगवा वापरल्याने केस गळतील.
 
केसांना दोन तोंडं दिसू लागतात. त्यापासून वाचायला हवं. केस पूर्णपणे वाळल्यानंतरच त्यावर कंगवा वापरावा. गुंता काढण्यासाठी आधी बोटांचा वापर करावा.
 
14 केस गळतीला समस्या समजून डॉक्टरांना कधी भेटावं?
केस एका चक्रामध्ये वाढत असतात. केस जर 90 दिवस वाढत असतील तर 2 आठवड्यांचा विरामाचा काळ असतो. त्यानंतर एका महिन्यानं केस गळतात. हेच चक्र सुरू असतं.
 
आपला प्रत्येक केस या चक्रातून जातो. त्यापैकी रोज किमान 100 केस गळण्याच्या अवस्थेत असतात. त्याचप्रकारे रोज जवळपास 100 केस गळणं हे अगदी सामान्य आहे.
 
याबाबत काळजी करण्याचं कारण नाही. त्यापेक्षा जास्त केस गळत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन कारण समजून घ्यावं.
कोंडा असेल तरी तो हाताने काढू नये. तो मुळापासून असेल तर सोरायसीस होऊ शकतो. हाताने कोरल्यास तो आणखी वाढेल.
 
डँड्रफचा कोणताही कायमस्वरुपी उपचार नाही. केसांच्या मुळाशी तेलाचा जास्त स्त्राव झाल्यास फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो.
 
आपल्याला वाटतं की, तेलाचा वापर केल्यानं ते ठिक होईल. पण तेलाच्या वापरानं आणखी आग होऊ शकते. कारण जास्त तेल कोंड्यासाठी कारणीभूत ठरतं. जर जळजळ, गाठ, मोठे फोड किंवा रक्तस्राव होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 
15 केस गळती रोखण्यासाठी सर्वोत्तम आहार काय आहे?
जे लोक साखरेचं अधिक सेवन करतात, धुम्रपान करतात आणि डेअरी उत्पादनं खातात त्यांनाही केस गळतीचा धोका असतो.
 
अनेक संशोधनांवरून हे स्पष्ट झालं आहे की, डेअरी उत्पादनांच्या अधिक वापरामुळं कोंडा आणि केसांची घनता कमी होऊ शकते.
 
जिम जाणाऱ्यांच्या 'व्हे प्रोटीन' नावाच्या प्रोटीन पावडरच्या वापरानंही केसांची घनता कमी होऊ शकते. त्याचा वापर करू नये, कारण ते गायीच्या दुधापासून तयार होतं.
 
महिलांमध्ये आयर्नची कमतरचा असू शकते. हिमोग्लोबिनशिवाय रक्तात आयर्न किती आहे, हेही पाहायला हवे. व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळंही केसगळती होऊ शकते.
 
थायरॉइडची समस्याही कारणीभूत ठरू शकते. व्हिटामिन बी-12 ची कमतरताही होऊ शकते. या पोषक तत्वांसाठी सप्लिमेंट घ्यावे.
 
फक्त बायोटिनच्या गोळ्या केस गळती रोखू शकत नाहीत.
 
झिंक, सेलेनियम आणि मॅग्निशियमची कमतरता हेदेखिल याचं कारण आहे. सुका मेवा आणि बीयांचं सेवन करावं. भोपळ्याच्या बीया, बदाम, काजू हे खावं.
 
प्रत्येक आहारात प्रोटिनचा समावेश करावा. शाकाहारींनी सोया, पनीर आणि दही खावं. मांसाहारी असल्यास अंडी प्रोटीनचा चांगला स्त्रोत असतात.
 
Published By- Priya Dixit