शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (20:55 IST)

ब्लीचचा परिणाम वाढवण्यासाठी हे अवलंबवा

काळपटपणा दूर करून चेहर्‍याला नवतजेला मिळवून देण्यासाठी महिला ब्लीच करून घेतात. बाहेरच्या ब्लीचमध्ये बरेच रासायनिक घटक असतात. त्यामुळे ब्लीच केल्यानंतर अनेकींना चेहर्‍यावर पुरळ उठणं, त्वचा लाल होणं अशा समस्यांना सामोरं जावं लागलं. त्यातही संवेदनशील त्वचा असणार्‍या महिलांना याचा खूपच त्रास होतो. वारंवार ब्लीच केल्याने त्वचेच्या मूळ रंगावर परिणाम होतो. चेहर्‍यावरची बारीक लव पांढरट दिसू लागते. इतकंच नाही तर आपला वर्णही पांढरट दिसू लागतो. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी तसंच ब्लीचचा परिणाम साधण्यासाठी काही नैसर्गिक उपाय करता येतील. त्याविषयी...
 
* मसूर डाळ रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी वाटून घ्या. त्यातच चमचाभर लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण चेहर्‍याला लावा. दहा मिनिटांनी धुवून टाका. यामुळे त्वचेला नैसर्गिक तजेला मिळेल.

* चेहर्‍यावर टोमॅटोच्या रसाने हलक्या हातांनी मसाज करा. वाळल्यावर थंड पाण्याने धुवून टाका. तुम्हाला ब्लीचसारखा लूक मिळेल.

* पपईचा गर घेऊन चेहर्‍याला लावा. तीन मिनिटं हलक्या हातांनी मसाज करा. 20 मिनिटांनी चेहरा धुवून हलक्या हातांनी पुसून घ्या. चेहरा छान उजळ दिसू लागेल. यामुळे ब्लीचचे दुष्परिणामही दूर होतील.

* दह्यामुळेही ब्लीचचा इफेक्ट मिळतो. यासाठी चेहर्‍यावर दही लावून 15 मिनिटं नीट मसाज करा. थोडा वेळ वाळू द्या. गार पाण्याने चेहरा धुवून टाका.

* संत्र्याच्या रसात हळद मिसळून हा रस चेहर्‍याला लावा. वाळल्यावर धुवून टाका. चेहरा तजेलदार दिसेल.