रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 (21:18 IST)

Foot Care Tips: हिवाळ्यात अशा प्रकारे पायाची काळजी घ्या, या वस्तूंचा वापर करा

foot
Foot Care Tips: डिसेंबरचा हंगाम सुरू आहे. अशात थंडीने सर्वांचीच अवस्था बिकट केली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण जॅकेट आणि स्वेटर घालत आहे, परंतु तरीही थंडी लोकांना त्रास देत आहे. या थंडीच्या मोसमात त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे, कारण थंडीचा थेट परिणाम त्वचेवर होतो. या थंडीच्या मोसमात त्वचा खूप कोरडी होते.
 
त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी लोक विविध प्रकारच्या स्किन केअर प्रोडक्ट्सचा वापर करतात. लोक चेहऱ्याची आणि हाताची काळजी घेतात, पण जेव्हा पायांचा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येकाला पायांची काळजी घेणे शक्य नसते. त्यामुळे पाय खूप कोरडे होऊ लागतात. हिवाळ्यात पायाची काळजी घेण्यासाठी या गोष्टींचा वापर करा. 
 
मध वापरा-
मधामध्ये असे अनेक घटक असतात, जे त्वचेच्या कोरडेपणापासून आराम देतात . जर तुम्हाला मध वापरायचे असेल तर ते 10 ते 15 मिनिटे पायांवर लावा आणि नंतर कोमट पाण्याने पाय स्वच्छ करा.
 
खोबरेल तेल वापरा-
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. पायाची आद्रता टिकवून ठेवण्यासाठी  खोबरेल तेल हा एक चांगला पर्याय आहे. याचा वापर करून तुम्ही तुमच्या पायाची आर्द्रता टिकवून ठेवू शकता.
 
कोरफड- 
कोरफडचा वापर त्वचेसाठी चांगला आहे. बाजारात कोरफड जेल मिळत. याचा वापर थेट पायावर करू शकता. घरच्या ताज्या कोरफडचा वापर देखील पायाचे मॉइश्चर टिकवण्यासाठी करू शकता. 
 
पेट्रोलियम जेली-
पायाची त्वचा कोरडी असते.पायाची काळजी घेण्यासाठी पेट्रोलियम जेली चांगला पर्याय आहे. याचा वापर केल्याने त्वचा मऊ होते. पेट्रोलियम जेली बाजारात सहज मिळते. 
 
Edited By- Priya DIxit