सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 20 डिसेंबर 2023 (19:50 IST)

Hair Care Tips : पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी नारळाच्या सालीचा असा वापर करा

coconut husk
Hair Care Tips : बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल केस कमी वयातच पांढरे होतात.केसांना काळे करण्यासाठी  वेगवेगळे प्रकाराचे हेअर कलर वापरले जाते. या हेअर कलर मुळे केसांना त्रास होतो. कारण या मध्ये रासायनिक उत्पादक असतात. हे केसांसाठी हानिकारक असतात.

हेअर कलर वापरल्याने केस काहीच कालावधी पर्यंत काळे राहतात. नंतर पुन्हा पांढरे दिसू लागतात. या हेअर कलर मुळे केस गळती सुरु होते. पांढरे केसांची समस्या इतकी सामान्य झाली आहे की आपल्या आजूबाजूच्या अनेक तरुणांनी यापासून सुटका मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. परंतु प्रत्येकाला त्याचे नैसर्गिक आणि सोपे उपाय मिळत नाही.आपण नारळाच्या सालीचा वापर करून केसांना काळे करू शकतो. याचा वापर केल्याने केस चांगले होतात. 
 
नारळ खाल्ल्यानंतर बहुतेक लोक त्याची साल फेकून देतात, परंतु ते खूप उपयुक्त आहे. त्याच्या मदतीने नैसर्गिक रंग तयार केला जाऊ शकतो. हे लावल्यानंतर तुम्हाला केमिकल बेस्ड डाईची गरज भासणार नाही. विशेष म्हणजे नारळाच्या साली व्यतिरिक्त वापरलेल्या सर्व गोष्टी पूर्णपणे नैसर्गिक आहेत, त्यामुळे कोणत्याही दुष्परिणामाची भीती नसते. 
कसे कराल- 
सर्वप्रथम कढईत नारळाची साल गरम करून त्याची भुकटी बनवा. आता ही भुकटी नारळाच्या तेलात मिसळा. हे तेल केसांना लावा. 1 तास तसेच ठेवा नंतर केसांना धुवून घ्या. हा नैसर्गिक उपाय केल्याने पांढरे झालेले केस काळे होतील. 
वापरण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला घ्या 
 
Edited By- Priya DIxit