शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 25 मार्च 2023 (15:17 IST)

Hair Care Tips :लहान वयात पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

आजच्या काळात बिघडलेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लहान वयातच लोकांच्या शरीरात अनेक प्रकारच्या समस्या सुरू होतात. त्याचा थेट परिणाम केस आणि त्वचेवर होतो. धावपळीच्या जीवनात वाढत्या तणावामुळे लहान वयातच केस पांढरे होण्याची समस्या दिसू लागते. आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती या समस्येने त्रस्त आहे.
 
पांढरे केस लपवण्यासाठी लोक हेअर कलरचा वापर करतात, त्यामुळे केस खराब होऊ लागतात. बाजारात उपलब्ध असलेल्या केसांच्या रंगांमध्ये अनेक प्रकारची रसायने आढळतात. ते वापरून केस खराब होऊ लागतात .काही घरगुती उपाय अवलंबवून  घरच्या घरी नैसर्गिकतात्या काळे केस मिळवू शकता. चला तर मग जाणून  घ्या  
 
आवळा आणि मेथी वापरा:
केस नैसर्गिकरित्या काळे करायचे असतील तर आवळा आणि मेथीचा हेअर मास्क तयार करा. यासाठी प्रथम तीन चमचे आवळा आणि मेथी पावडर मिक्स करून त्यात थोडे पाणी घालून काही वेळ असेच राहू द्या. आता ते केसांना लावा आणि कोरडे होऊ द्या आणि तासाभरानंतर धुवा. त्याचा परिणाम काही महिन्यांनंतर दिसून येईल. 
 
काळा चहा वापरा- 
काळा चहा केसांसाठी खूप फायदेशीर आहे. केसांना लावण्यासाठी दोन चमचे काळा चहा आणि एक चमचा मीठ एक कप पाण्यात उकळवा. हे पाणी थंड झाल्यावर केस धुवा. याचा वापर केल्याने तुमच्या केसांना चमक येईल. 
 
मेंदी आणि कॉफी-
केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी मेंदी आणि कॉफीचा मास्क खूप फायदेशीर आहे. यासाठी सर्वप्रथम एक कप पाण्यात एक चमचा कॉफी टाकून चांगली उकळा. ते थंड झाल्यावर त्यात मेंदी पावडर टाका. हा मास्क केसांवर काही काळ राहू द्या. तासाभरानंतर धुवून टाका. 
 
कांद्याचा रस-
कांद्याचा रस केसांसाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी कांद्याचा रस काढून केसांच्या मुळांना लावा आणि तीस मिनिटे असेच राहू द्या. आता ते चांगले धुवा. याच्या वापराने केस गळतीची समस्याही दूर होईल.
Edited By - Priya Dixit