शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 1 एप्रिल 2023 (14:01 IST)

Hair Care Tips : डोक्यात उवा असतील तर हे घरगुती उपाय करा

केस कितीही चांगले असले तरी त्यात उवा असतील तर त्यांचे सौंदर्य कमी होऊ लागते. त्यामुळे केसांना खाज सुटू लागते. खाज सुटल्यामुळे केस गळण्याची समस्या समोर येऊ लागते. केसांची स्वच्छता नसल्यामुळे उवांची समस्या उद्भवते. ज्या लोकांच्या डोक्यात उवा असतात, ते दिवसभर अस्वस्थ दिसतात.
 
उवांची अंडी केसांमध्ये अशा प्रकारे चिकटून राहतात की लाख प्रयत्न करूनही ती केसांतून बाहेर येत नाही. मात्र, बाजारात अनेक प्रकारचे शाम्पू आणि तेल उपलब्ध आहेत, ज्याच्या वापराने उवा कमी होऊ लागतात. पण, जर तुम्हाला उवा मुळापासून नष्ट करायच्या असतील तर तुम्ही यासाठी काही घरगुती उपाय करून पाहू शकता. 
ज्याचा अवलंब करून तुम्ही डोक्यातील उवांपासून मुक्ती मिळवू शकता. 
 
कडुलिंब आणि तुळशीचे तेल बनवा
केसांतील उवा दूर करण्यासाठी सर्वप्रथम एका प्लेटमध्ये कडुलिंब आणि तुळशीची पाने एकत्र करून एक चमचा पाण्यात बारीक करून घ्या. यानंतर आता एका पातेल्यात खोबरेल तेल घेऊन मंद आचेवर गरम करून त्यात पानांची पेस्ट टाका. आता हे तेल थोडा वेळ थंड होऊ द्या. आता धुतलेल्या केसांवर कोमट लावा. यामुळे उवाही मरतील आणि केसांशी संबंधित इतर समस्यांवरही फायदा होईल.
 
कांद्याचा रस लावा -
कांद्याचा रस केसांसाठी खूप फायदेशीर आहे. उवा काढण्यासाठी देखील हे खूप उपयुक्त आहे. कांद्याचा रस बनवण्यासाठी प्रथम दोन ते तीन कांदे बारीक करून त्याचा रस काढा. आता त्यात एक चमचा हळद टाकून टाळूला लावा. काही वेळाने केस धुवा. 
 
लिंबाचा रस लावा -
लिंबाचा रस उवा मारण्यासाठी खूप फायदेशीर आहे. केसांना लावण्यासाठी प्रथम आठ ते दहा लिंबाचा रस काढून ठेवा. हे टाळूवर लावल्याने उवा दूर होण्यास मदत होईल.
 
लसूण आणि लिंबू एकत्र लावा-
लसूण आणि लिंबाची पेस्ट करूनही तुम्ही केसांमधील उवा दूर करू शकता. यासाठी प्रथम लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घ्या आणि त्यात लिंबू पिळून नंतर बारीक करा. अर्ध्या तासाने केसांना लावल्यानंतर डोके धुवा. त्याचा परिणाम काही वेळातच दिसू लागेल. 
 
Edited By - Priya Dixit