गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (13:54 IST)

आपली आवडती लिपस्टिक एक्स्पायर झाली आहे का? या पद्धतीने जाणून घ्या

Has your favorite lipstick expired? Learn this way आपली आवडती लिपस्टिक एक्स्पायर झाली आहे का? या पद्धतीने जाणून घ्या Beauty tips or  favorite lipstick expired In Marathi आपली आवडती लिपस्टिक एक्स्पायर झाली आहे का? या पद्धतीने जाणून घ्या ब्युटी टिप्स इन मराठी वेबदुनिया  मराठी
सुंदर दिसण्यासाठी स्त्रिया खूप प्रयत्न करतात. चांगले कपडे परिधान करतात. चांगला मेकअप करतात. या मध्ये लिपस्टिक त्यांचा लूक छान बनवण्यात खूप मदत करते. या साठी महिला लिपस्टिकचे अनेक रंग निवडतात आणि वेळोवेळी त्यांच्या आवडीनुसार आणि ड्रेसच्या मॅचिंगनुसार लावतात. पण लिपस्टिकची संख्या जास्त असल्याने अनेक वेळा काही लिपस्टिक दीर्घकाळ टिकून राहतात, तर काही लिपस्टिक एक्स्पायर होतात. अशा परिस्थितीत जर आपण एक्स्पायर झालेले  लिपस्टिक वापरले तर अनेक नुकसान होऊ शकत. एक्स्पायर झालेली लिपस्टिक कशी ओळखायची जाणून घेउ या.
 
1 लिपस्टिक मधून दुर्गंध येते - आपण लिपस्टिक उघडताच किंवा लावताच, एक सुंदर चवीचा सुगंध येतो, जर आपल्याला लिपस्टिक मधून दुर्गंध येत असेल तर अशा लिपस्टिकचा वापर करणे टाळा कारण ही लिपस्टिक वापरण्यासाठी योग्य नाही.
 
2 लिपस्टिक वर थर दिसून येते- जर आपल्याला लिपस्टिकवर पाण्याच्या थेंबासारखा थर दिसला तर ते  लिपस्टिक एक्स्पायर झाल्याचे लक्षण आहे. अशी लिपस्टिक अजिबात वापरू नका आणि त्या जागी नवीन लिपस्टिक लावा.
 
3 लिपस्टिक कोरडी होते- जेव्हा आपण कोणतीही लिपस्टिक आणतो तेव्हा ती खूप चांगली  आणि ओलसर असते ज्यामुळे ती आपल्या ओठांवर सहज लावता येते. पण जर आपल्या  लक्षात आले की आपली लिपस्टिक कोरडी होऊ लागली आहे, तिचा पोत बदललेला आढळला तर ती चुकूनही वापरू नका.
 
4 लिपस्टिक ला दोन वर्षे किंवा त्याहून अधिक झाली असल्यास-  प्रत्येक लिपस्टिकची एक्सपायरी डेट वेगळी असली तरी ती साधारणपणे दोन वर्षांसाठीच असते. त्यामुळे आपल्या लिपस्टिकला 2 वर्षांपेक्षा अधिक झाले असल्यास तर ती बदलण्याची वेळ आली आहे. लिपस्टिकच्या बाटलीवर लिहिलेल्या एक्सपायरी डेटवरून आपल्याला कळू शकते.