रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (15:58 IST)

टाचांना भेगा पडल्या आहेत ,मग हे 3 घरगुती पॅक अवलंबवा

टाचांना भेगा पडल्यास आपल्याला अस्वस्थता जाणवते. बऱ्याच वेळा या भेगा असहनीय होतात.यामध्ये खूप वेदना जाणवते चालणे देखील अवघड होते. हिवाळा आणि थंड हवामान बऱ्याच वेळा जास्तकाळ उभे राहणे. वेळीअवेळी अयोग्य खाणे आणि बदलत्या जीवनशैली मुळे टाचांना भेगा पडतात. या साठी काही घरगुती उपाय आहेत जे आपल्या भेगा पडलेल्या टाचांना सुंदर आणि मऊ बनवतात.चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 ग्लिसरीन आणि गुलाब पाणी- हे त्वचेला मऊ बनवतो.हे पॅक बनवण्यासाठी 1 चमचा गुलाब पाणी आणि 1 चमचा ग्लिसरीन समप्रमाणात मिसळून भेगा पडलेल्या टाचांवर लावा आणि त्याला कोरडे होऊ द्या. असं नियमितपणे केल्याने टाचांच्या भेगा कमी होतात.
 
2 नारळाचं तेल आणि ऑलिव्ह तेल - हे मॉइश्चराइझरचे काम करत.पायांना मऊ ठेवण्यासाठी दररोज ह्याचा वापर करावा. हे पॅक बनविण्यासाठी 1 चमचा ऑलिव्ह तेल, आणि 1 चमचा नारळाचं तेल घेऊन मृत त्वचेला काढून आपल्या टाचांवर मसाज करा. मोजे घालून ठेवा आणि तो पर्यंत हे पॅक वापरावे जो पर्यंत भेगा भरून निघत नाही. हे तेल लावण्यापूर्वी दररोज आपल्या पायांना धुवून कोरडे करून घ्या.  
 
3 कडू लिंब आणि हळद - जर भेगा जास्त असतील आणि त्यात खाज आणि सूज असल्यास हे पॅक वापरा.या साठी कडुलिंबाची पाने आणि 1/2 चमचा हळद घेऊन पाने वाटून घ्या आणि ही पेस्ट भेगा पडलेल्या टाचांवर लावून अर्धा तास तसेच राहू द्या. नंतर पायांना गरम पाण्याने धुवून घ्या. असं केल्याने टाचांवरील भेगा नाहीशा होतील.