1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (15:35 IST)

Festive Skin Care Tips:दिवाळीत पार्लर जाण्यासाठी वेळ नाही, हे करा चेहरा उजळून निघेल

सर्व सण वर्षातून एकदाच येतात. त्यासाठी आनंद असतो ,उत्साह असतो. पण सणासुदीचे कामाचा व्याप जास्त असल्यामुळे अनेकदा पार्लर जाण्यासाठी देखील वेळच मिळत नाही. हे काही सोपे उपाय आहे ज्यांना अवलंबवून आपण आपले सौंदर्य उजळू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.  
 
1. कॉफी आणि लिंबू - लिंबूमध्ये अधिक ब्लिचिंग गुणधर्म असतात जे आपल्या त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्याचे काम करतात. लिंबूचे दोन भाग करा आणि एका भागावर कॉफी पावडर टाका आणि त्यानंतर चेहऱ्यावर आणि हात-पायांवर लावा. 10 मिनिटांनंतर सामान्य पाण्याने स्वच्छ करा. आपला  चेहरा उजळून निघेल.
 
2. टोमॅटो - टोमॅटो चेहरा पूर्णपणे स्वच्छ करतो. एक टोमॅटो घ्या आणि चेहऱ्यावर चोळा. 10 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
 
3. हळद, बेसन आणि गुलाबजल - एक चमचा बेसन घ्या आणि त्यात चिमूटभर हळद घाला. लक्षात ठेवा की जास्त हळद घालू नका अन्यथा चेहरा पिवळा होईल . त्यामुळे थोडी हळदच वापरावी. त्यात गुलाबजल मिसळा आणि तिन्ही वस्तू मिसळून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर लावा. जेव्हा ते हलके कोरडे होऊ लागते तेव्हा हलक्या हातांनी चोळा जेणे करून चेहऱ्यावर साचलेली घाण निघून जाईल. त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा.
 
4. आईस मसाज - यासाठी बर्फाचा क्यूब काढून पॉलीबॅगमध्ये ठेवा आणि सुमारे 10 मिनिटे चेहऱ्यावर मसाज करा. लक्षात ठेवा बर्फ थेट त्वचेवर लावू नका. आईस क्यूब नंतर चेहरा थोडा नॉर्मल होऊ द्या. त्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर क्रीम लावा.
 
5. कच्च दूध - कच्च दूध चेहऱ्यावरही लावता येते. सकाळी दूध आल्यावर ते एका भांड्यात काढून चेहऱ्याला लावा. यामुळे चेहरा खूप स्वच्छ होईल. आणि मेकअप करणे सोपे होईल. कच्चे दूध लावल्यानंतर 10 मिनिटांनी चेहरा धुवा.