मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

काळपट अंडरआर्म्स पासून मुक्तीसाठी 6 घरगुती उपाय

या सहा नैसर्गिक उपाय अमलात आणून आपण नेचरली काळपट अंडरआर्म्सचा रंग हलका करू शकतात.
 
बटाटा
बटाटा एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे. याने इतर ब्लीचिंग एजंटप्रमाणे त्वचेत इरिटेशन होत नाही. बटाट्याचा पातळ तुकडा कापून अंडरआर्म्सवर चोळावा. वाटल्यास याचे रस काढून काळ्या भागेवर लावून 15 ते 20 मिनिट राहू द्या. नंतर कोमट पाण्याने धुऊन घ्या.
 
काकडी
बटाट्याप्रमाणे काकडीही नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे. याने त्वचेचा रंग हलका होण्यात मदत मिळते. काकडीची स्लाइस किंवा रस अंडरआर्म्सवर लावा. चांगल्या परिणामासाठी हा उपाय दिवसातून दोनदा अमलात आणू शकता.
 
लिंबू
लिंबू एक नैसर्गिक ब्लीचिंग, अँटीबॅक्टिरियल आणि अँटीसेप्टिक एजंट आहे. अनेक त्वचासंबंधित आजारासाठी लिंबाचा रस वापरण्यात येतो. लिंबू कापून अंडरआर्म्सवर चोळा किंवा लिंबाचा रस प्रभावित भागेवर लावून 15 मिनिट राहून द्या. आपण लिंबाच्या रसात जरा साखरही मिसळू शकता. असे आठवड्यातून 2-3 वेळा करा. लिंबाने त्वचा कोरडी पडते म्हणून नंतर लगेच मॉइस्चराइजर लावा.
 
बेकिंग सोडा
डेड स्कीन हटवण्यासाठी बेकिंग सोडा पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट अंडरआर्म्सवर लावा. वाळल्यावर अंडरआर्म्स चोळून स्वच्छ करा. असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता.
 
संत्र्याची साल
संत्र्याची साल त्वचेचे रंग हलके करण्यात फायदेशीर ठरते. साल काही दिवस उन्हाळ्यात वाळवून घ्या. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून पावडर तयार करा. आता दोन ते तीन चमचे पावडर गुलाब पाण्यात किंवा दुधात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट अंडरआर्म्सवर 10 ते 15 मिनिट लावून ठेवा नंतर धुऊन टाका. आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा.
 
नारळाचे तेल
नारळाच्या तेलात व्हिटॅमिन इ आढळतं. हे रंग स्वच्छ करण्यात तसेच नैसर्गिक डिओडरेंटचे काम करतं. कोकोनट ऑयलने अंडरआर्म्सची मालीश करून 10 ते 15 मिनिट तसेच राहू द्या. नंतर हलक्या साबण वापरून धुऊन टाका. हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा अमलात आणू शकतो.