1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

घरी तयार करा नेलपेंट रिमुव्हर

Prepare at home Nailpaint Remover
जुनं नेलपेंट काढताना लक्षात येतं की नेलपेंट रिमुव्हर संपलं आहे. अशा वेळी रोजच्या वापरातल्या टूथपेस्टनं तुम्ही नखं स्वच्छ करू शकता. यासाठी एका जुन्या ब्रशवर थोडीशी पेस्ट घ्या. ती पेस्ट काही काळ नखांवर लावून ठेवा. थोड्या वेळाने नखांना मालिश करा. त्यानंतर नखं धुवून टाका. नखांवरचं नेलपेंट जाईलच शिवाय नखांचा पिवळेपणा जाऊन नखांवर तेज येईल.