रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

7 दिवसात स्वच्छ करा काळी मान

उन्हाने गळ्यावर टेनिंग होऊन जाते ज्याने आपला चेहरा जरी गोरा दिसतं असेल तरी मान काळीच दिसते. बेकिंग सोड्याच्या मदतीने मान स्वच्छ केली जाऊ शकते. बेकिंग सोडा, लिंबू आणि नारळाचे तेल मिसळून तयार केलेली पेस्ट लावल्याने काळ्या मानेची समस्या दूर होईल.
कशी तयार कराल ही पेस्ट:
-> एका बाऊलमध्ये 1 चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यात अर्था चमचा दही मिसळून पेस्ट तयार करा. दह्यात लॅक्टिक अॅसिड असतं, ज्याने त्वचा उजळण्यात मदत मिळते. दह्याऐवजी पाणीही वापरू शकता. 
 
-> आता या पेस्टमध्ये नारळाच्या तेलाचे काही थेंब टाकून याला मिक्स करा. नारळाच्या तेलाने घाण निघून जाते आणि पोर्स स्वच्छ होतात.
 
-> आता एका नरम टॉवेल गरम पाण्यातून काढून पिळून घ्या. या टॉवेलने मानेच्या जवळपासची जागा रगडून स्वच्छ करून घ्या आणि 2 मिनिट तसेच राहू द्या. टॉवेलमधून निघत असलेल्या वाफेने पोर्स खुलतील.
 
-> आता पॅक लावण्यापूर्वी आधी पेच टेस्ट करून पहा. हे पॅक हातावर लावून थोड्या वेळ वाट बघा. काही रिऍक्शन होत नसल्यास मानेवर लावा.
 
-> या पॅकची हलकी लेयर मानेवर लावा. 15 मिनिट तसेच राहू द्या. वाळू लागल्यावर पाण्याच्या मदतीने राउंड स्क्रब करत पाण्याने सोडवून घ्या.
 
-> आपली मान नरम टॉवेलने पुसून घ्या. रगडायचे नाहीये हे लक्षात असू द्या.
 
-> आता मानेवर हलक्या हाताने बॉडी लोशन लावा आणि तसेच राहू द्या, ज्याने पोर्समध्ये मॉइस्चराइजर जिरून जाईल.
 
विशेष नोट- आपल्या मानेवर किंवा त्याच्या जवळपासच्या स्कीनवर जखम असल्यास बेकिंग सोडा लावू नये.