पायांचा कोरडेपणा घालवण्यासाठी काही टिप्स  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  काही लोकांची त्वचा खूप कोमल आणि मुलायम असते. मात्र याउलट काही लोकांची त्वचा खूप प्रयत्न केल्यावरही कोरडीच असते आणि हिवाळ्यात समस्या वाढतात. पायाच्या कोरड्या त्वचेवरील उपचाराबाबत काही टिप्स - 
				  													
						
																							
									  
	तुमची त्वचा खूप जास्त कोरडी असेल आणि पायाच्या कोरड्या त्वचेमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरड्या त्वचेसाठी केवळ क्रीम इत्यादि पुरेसे नाही तर साफ-सफाईकडेही लक्ष देण्याची गरज असते. पायाची कोरडी त्वचा मुलायम करण्याआधी हे लक्षात घ्या की, तुम्ही कधीही उघड्या पायांनी राहू नका, पायांत नेहमी बूट-चप्पल इत्यादी घाला. पायांची योग्यप्रकारे साफसफाई करा.
				  
	वेळोवेळी पेडीक्योर करीत राहणे पायाच्या त्वचेला नरमपणा आणते. आंघोळ करताना पायांना वॅसलीन तेल इत्यादी लावावे. शिवाय बाहेर जाताना पायांवर चांगल्या क्वालिटीचे क्रीम लावावे. ज्यामुळे पाय मुलायम राहतात.
				  				  
	पायाचा कोरडेपणा थांबवण्यासाठी दररोज रात्री पाय चांगल्याप्रकारे धुऊन क्रीम लावून झोपावे. त्यामुळे पाय कोमल राहतील. पायांची त्वचा मुलायम होण्यासाठी आणि संक्रमण टाळण्यासाठी व्हिटॅमिन ‘ई’ युक्त जैतून तेल वापरावे. जैतून तेल अँटीआक्सिडंट्सने भरपूर असते, जे त्वचेला मृदू बनविते. व्हिटॅमिन आणि प्रोटिनयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	पायांच्या त्वचेसह पायांच्या नखांचीही देखभाल खूप आवश्यक आहे. अशात तुम्ही त्वचेचा नरमपणा कायम ठेवण्यासाठी किमान पंधरा दिवस पेडिक्योर करा. पायांना जास्त गरम पाण्यांनी धुऊ नये. एवढे करूनही तुमची 
				  																								
											
									  
	 
	त्वचा कोरडीच राहिली तर तुम्ही स्किन स्पेशालिस्टकडून उपचार करावे. 
	 
	पाय सांभाळणे, त्यांच्याकडे नियमित लक्ष देणे हे महत्त्वाचे आहे. पायाची नखे कापताना ती बोटांलगोलग न कापता थोडे अंतर ठेवून कापली पाहिजेत. 
				  
				  
	त्वचा कोरडी होत असेल तर त्यावर त्वचा मुलायम करणारी औषधे किंवा तेल चोपडले पाहिजे. पायाला भोवरी असेल तर ती काढून घेतली पाहिजे.
				  																	
									  
	 
	स्लीपर किंवा अर्धा अधिक पाय उघडा ठेवणा-या चपला वापरण्याऐवजी बूट वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पायाच्या संवेदना कमी झाल्या तर नियमितपणे पाय तपासायला हवेत. 
				  																	
									  
	 
	पायाची खालची बाजू आपल्याला नीट दिसत नाही म्हणून प्रसंगी पायाखाली आरसा धरून हे केले पाहिजे. कुठे जखम आढळली तर ती गोष्ट त्वरित डॉक्टरांच्या नजरेस आणून दिली पाहिजे. अनवाणी चालणे टाळावे.