सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 24 सप्टेंबर 2018 (13:12 IST)

कॉन्टॅक्ट लेन्स लावत असाल तर मेकअप करताना घ्या काळजी

अलीकडे आपल्या सौंदर्यात भार घालण्यासाठी अनेक महिला कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करतात. अशावेळी मेकअप करताना डोळ्यांचं मेकअप करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. सुंदर डोळ्यांनी तुमचं व्यक्तिमत्त्व आणखी सुंदर होतं. अनेकदा डोळ्यांचं मेकअप करताना केल्या जाणार्‍या चुकामुंळे डोळ्यांमध्ये इन्फेक्शन आणि इतरही काही सस्या होण्याचा धोका असतो. त्यामुळे कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करणार्‍या महिलांनी डोळ्यांचं मेकअप करताना खालील गोष्टींची काळजी घ्यायला हवी. 
 
स्वच्छतेची घ्या काळजी
कॉन्टॅक्ट लेन्स लावताना हात चांगल्याप्रकारे स्वच्छ करुन स्वच्छ कापडाने पुसा. कॉन्टॅक्ट लेन्सला हात लावताना हात स्वच्छ आणि कोरडे असले पाहिजे. त्यानंतर डोळ्यांवर लेन्स लावण्यापूर्वी लेन्स सोल्यूशनने नक्की स्वच्छ करा. याचप्रकारे लेन्स काढल्यावरही स्वच्छ करुन बॉक्समध्ये ठेवा. याने तुच्या डोळ्यांना इन्फेक्शन होणार नाही.
 
योग्य मेकअप उत्पादनांचा वापर
बाजारात ळिणारी जास्तीत जास्त मेकअप उत्पादने सामान्य डोळ्यांसाठी तयार केलेली असतात. जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स लावत असाल तर तुचे डोळे अधिक संवेदनशील होतात. त्यामुळे तुम्हाला डोळ्यांच्या मेकअपसाठी उत्पादनांची निवड करताना काळजी घ्यावी लागेल. तुच्यासाठी हायपोएलर्जेनिक मेकअप उत्पादनांचा वापर करणे अधिक चांगले ठरेल. कारण या उत्पादनामुंळे अ‍ॅलर्जी होण्याचीशक्यता की असते. 
 
लेन्स लावल्यावर करा मेकअप
डोळ्यांचं मेकअप करण्यापूर्वी तुम्ही आपल्या कॉन्टॅक्ट लेन्स काळजीपूर्वक आणि स्वच्छतेने लावा. त्यानंतर प्रायमर लावा, कारण याने शॅडोज आणि लायनर ठिक राहतात. काळजी घ्या की, तुम्ही पावडरऐवजी क्रिम शॅडोजचा वापर करा. जेणेकरुन ते तुमच्या डोळ्यात येणार नाही. क्रीम शॅडोज डोळ्यांमध्ये जास्त जळजळ निर्माण करतात त्यामुळे काळजी घ्यावी. वॉटर बेस्ड क्रीम शॅडोजचा वापर करा. 
 
आयलायनर
कॉन्टॅक्ट लेन्स लावणार्‍यांनी जेल किंवा क्रीम लायनर्सऐवजी पेन्सिल लायनर्सचा वापर करावा. यासाठी लेड असलेल्या पेन्सिलचा वापर करु नका कारण लेडचे कण डोळ्यांसाठी नुकसानकारक होऊ शकतात.