शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

Bindi Allergy बिंदी लावल्याने कपाळावर ऍलर्जी होते? नैसर्गिक उपाय फायदेशीर

Bindi Allergy भारतीय महिलांच्या शृंगारात बिंदीचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. महिला तयार होताना बिंदी लावायला विसरत नाहीत. कोणतीही महिला बिंदी लावली की तिचे सौंदर्य वाढते. पण कधी कधी बिंदी लावल्याने ऍलर्जी होते. बिंदी लावल्याने अनकांच्या कपाळावर खाज सुटू लागते. बिंदी चिकटवण्यासाठी पॅरा टर्शरी ब्यूटाइल फिनॉल रसायन वापरले जाते. 
 
अनेक महिलांची त्वचा अतिशय संवेदनशील असते. ज्यामुळे महिलांना अॅलर्जीचा त्रास होतो. या कारणामुळे अनेक महिला बिंदी लावणे बंद करतात. तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशाच काही पद्धतींबद्दल सांगणार आहोत. ज्या तुम्हाला बिंदी लावण्यापूर्वी वापराव्या लागतीत. या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही या अॅलर्जीपासून मुक्त होऊ शकता.
 
बिंदीची ऍलर्जी टाळण्यासाठी हे उपाय करून पाहू शकता-
 
मॉइश्चराइजर लावा
अनेकदा बिंदीमुळे स्किन ड्राय होऊ लागते. अशात एलर्जीपासून बचावासाठी दिवसातून तीन ते चार वेळा कपाळावर मॉश्चराइजर लावा. ज्याने बिंदी लावत असलेल्या ठिकाणी त्वचा नरम राहील.
 
एलोवेरा जेल
रोज रात्री झोपण्यापूर्वी कपाळावर एलोवेरा जेल लावा. याने स्किन एलर्जी दूर होण्यास मदत होऊ शकते. एलोवेरामध्ये एंटी-बॅक्टीरियल आणि एंटी-सेप्टिक गुण असल्यामुळे एलर्जीचा त्रास दूर होतो.
 
नारळ तेल
बिंदी लावत असलेल्या ठिकाणावर दररोज नारळाच्या तेलाने 2 मिनिट हलक्या हाताने मसाज करावी. नारळाचा तेल त्वचेसाठी सर्वोत्तम मॉश्चराइजिंग एजेंट असल्याचं मानलं जातं.
 
कपाळावर कुंकु लावा
जर काही केल्या एलर्जी कमी होत नसेल तर कुमकुम बिंदी वापरा. ओलं कुंकु लावल्याने ते वाळल्यावर तसंच राहतं त्याला चिकटवण्याची गरज नसते. आणि याने त्वचेवर विपरित प्रभाव पडत नाही.

अस्वीकरण (Disclaimer) : औषध, आरोग्य टिप्स, योग, धर्म, ज्योतिष इत्यादी विषयांवर वेब जगतात प्रकाशित/प्रसारण केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. या संबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.