बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 7 नोव्हेंबर 2023 (12:53 IST)

To look younger वाढत्या वयात तरुण दिसण्‍यासाठी 5 सोप्या ट्रिक्स

Ways to Look Younger वय वाढणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी थांबवता येत नाही, परंतु काही सवयी आहेत ज्याचा अवलंब करून आपण वृद्धापकाळातही तरुण दिसू शकतो. व्यस्त जीवन आणि कामाच्या ओझ्यामुळे आपण अनेकदा आपल्या खाण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करतो, ज्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. योग्य खाण्याच्या सवयींचा अभाव आपल्या त्वचेवर परिणाम करतो, ज्यामुळे आपण आपल्या वयाच्या आधी म्हातारे दिसू लागतो, म्हणून आपण आपल्या शरीराची काळजी घेणे आणि म्हातारपणातही तरुण आणि तंदुरुस्त दिसणे महत्त्वाचे आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी कोणत्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.
 
संतुलित आहार
वाढत्या वयात यंग आणि फिट दिसण्यासाठी आवश्यक आहे संतुलित आहार. यासाठी आपला दररोजचा आहार 5 भागात वाटून घ्या. यात विविध प्रकाराच्या भाज्या आणि फळांचा समावेश करा.
 
नियमित व्यायाम
यंग दिसण्यासाठी नियमित व्यायाम करणे खूप प्रभावी आहे. याने शरीरात होणार्‍या आजारांपासून मुक्ती मिळते आणि निरोगी राहण्यास मदत होते. तसेच व्यायामामुळे स्नायूंची ताकद, शरीराची लवचिकता सुधारण्यास आणि हृदयविकार टाळण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला उत्कटासन, कोणासन, भुजंगासन यासारखी योगासने केली पाहिजे.
 
भरपूर प्रमाणात पाणी प्या
यंग स्किन आणि संपूर्ण आरोग्याची काळजी घेण्यासाठी शरीराला हायड्रेटेड असणे आवश्यक आहे. यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. पाणी शरीरातून विषारी घटक बाहेर काढण्यात मदत करतं.
 
पुरेशी झोप
शरीराला रिपेयर करण्यासाठी रात्री चांगली झोप घेणे आवश्यक आहे. झोप कमी झाल्यास चिडचिड होते आणि कमी वयात मनुष्य वृद्ध दिसू लागतो. अशात एका दिवसात 7 ते 8 तासाची झोप घेणे आवश्यक आहे. पुरेशी झोप ताजेतवाने ठेवते आणि शरीर सक्रिय राहण्यास मदत होते.
 
स्ट्रेस मॅनेजमेंट
जास्त वेळ तणावात राहणे हानिकारक ठरू शकतं, त्यामुळे स्वतःला तणावमुक्त ठेवणे गरजेचे आहे. तणावमुक्त राहण्यासाठी रोज योग आणि ध्यान करता येतं. योग आणि ध्यान तुम्हाला तणावमुक्त राहण्यास आणि मानसिक आणि भावनिकदृष्ट्या संतुलित ठेवण्यास मदत करतं.