गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

चेहर्‍याच्या शेपप्रमाणे निवडा ज्वेलरी

व्यक्तिमत्त्वाला शोभणारे कपडे निवडण्याइतकंच महत्त्व दागिन्यांच्या निवडीलाही द्यायला हवं. पाहा आपल्या चेहर्‍यावर कोणते दागिने शोभून दिसततील:


 
गोल चेहरा
गोल चेहर्‍याच्या महिलांनी नेकलाईनच्या खाली येणारं नेकलेस निवडायला हवा. त्यांनी लांब, सरळ कानातली निवडायला हवीत. गोलाकार मण्यांचे दागिने गोल चेहर्‍याला शोभून दिसत नाही. चौकोनी, लंबगोल कानातल्यांमुळेही गोल चेहरा उठून दिसेल. टियरड्रॉप प्रकारची गोल कर्णभूषणे चेहर्‍याला सर्वाधिक शोभून दिसतील.

लंबगोल चेहरा
लंबगोल चेहर्‍याच्या व्यक्ती नशीबवान असतात. अशा चेहर्‍याला विविध आकार आणि प्रकारांची कानातली शोभून दिसतात. लंबगोल चेहर्‍याच्या महिलांना बरेच प्रयोग करायची संधीही मिळते. त्यांना लांब तसंच गळाबंद नेकलेसही ट्राय करता येतील. कोणत्याही प्रकारची कानातली या चेहर्‍याला शोभून दिसतील.


चौकोनी चेहरा
चौकोनी चेहरा असलेल्या महिलांनी कॉट्रास्ट ज्वेलरी ट्राय करायला हवी. चोकर नेकलेस अशा चेहर्‍याला शोभून दिसेल. त्यावर छोटी किंवा गोल कानातली निवडा. बटणाच्या आकाराची कानातलीही शोभून दिसतील.


हार्ट शेप चेहरा
हार्ट शेप चेहरा असलेल्या महिलांची हनुवटी अरुंद असते. चोकर किंवा छोटे नेकलेस निवडल्याने असा चेहरा गोलाकार दिसू लागेल.