1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 जुलै 2025 (00:30 IST)

तरुण आणि सतेज त्वचेसाठी क्रायोथेरेपीने उपचार, खबरदारी जाणून घ्या

Cryo Facial:स्‍नायूच्‍या समस्‍येने त्रस्‍त असल्‍यास क्रायोथेरपी केली जाते.जेव्हा शरीराचे स्नायू ताणले जातात आणि ऊती कमकुवत होतात तेव्हा ही थेरेपी वापरली जाते. या थेरपीमध्ये व्यक्तीला अत्यंत कमी तापमानात ठेवले जाते. याला आइस पॅक थेरपी किंवा क्रायो सर्जरी असेही म्हणतात.
त्वचेच्या समस्या जसे की  मस्से, तीळ, सनबर्न यावर देखील क्रायथेरपीद्वारे उपचार केले जातात. तरुण राहण्यासाठी आणि त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी क्रायोथेरपीचा वापर करतात.
 क्रायोथेरेपी
या थेरपीमध्ये शरीर पूर्णपणे थंड केले जाते. जेणेकरून शरीरातील सर्व उष्णता आणि जळजळ बाहेर पडेल. या थेरपीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यानंतर हळूहळू विस्तारू लागतात. शरीराच्या दुखापत झालेल्या भागावर बर्फ लावल्याप्रमाणे ही थेरपी असते . क्रायोथेरपी करण्यासाठी, डोके वगळता संपूर्ण शरीर कोल्ड चेंबरमध्ये ठेवले जाते. 
 
स्ट्रेचिंग व्यायाम महत्वाचे आहेत
या वेळी चेंबरचे तापमान उणे 150 अंश सेल्सिअस असते. क्रायोथेरपीमध्ये, चेंबर थंड करण्यासाठी नायट्रोजनचा वापर केला जातो. केवळ अंडरवेअर आणि चांगल्या दर्जाचे मोजे घालूनच चेंबरमध्ये जावे लागते. ही थेरपी पूर्ण करण्यासाठी 30 सेकंद ते 3 मिनिटे चेंबरमध्ये राहावे लागते. मग ते पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला स्ट्रेचिंग व्यायाम करावे लागतील. त्यामुळे रक्ताभिसरण वाहिन्यांमध्ये सुरळीतपणे रक्त वाहू लागते. 
क्रायोथेरपी करताना घ्यावयाची काळजी
 खबरदारी 
ही थेरपी करण्यापूर्वी, तुम्हाला द्रवपदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.
कारण जेव्हा त्वचेवर द्रव गोठतो तेव्हा थंडीमुळे जळण्याचा धोका असतो. 
क्रायथेरपी करण्यापूर्वी शरीर पूर्णपणे वाळवले पाहिजे.
हृदयविकार, दमा, उच्च किंवा कमी रक्तदाब, ताप किंवा जखमा असल्यास क्रियोथेरपी घेऊ नये. 
गर्भवती महिलांनी या थेरपीपासून दूर राहावे.
हायपोथर्मिया किंवा थरकाप होत असल्यास ही थेरपी त्वरित थांबवावी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited by - Priya Dixit