बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

थकवा दूर करण्यासाठी ग्रीन टी फेस पॅक

चेहर्‍यावर चमक आणण्यासाठी घरगुती फेस पॅक सर्वोत्तम ठरतं. जेव्हा ही स्कीन थकलेली किंवा डल वाटत असेल तेव्हा तांदूळ आणि ग्रीन टी चा घरी तयार केलेला फेस पॅक स्किनला रिलॅक्स होण्यात मदत करेल. बघू कसं तयार करायचा हा पॅक:
सामुग्री- लिंबू, ग्रीन टी, 2-3 थेंब पिपरमिंट किंवा टी ट्री तेल.
 
कृती- एका वाडग्यात 2 चमचे तांदळाचा आटा घेऊन त्यात 1/4 चमचा लिंबाचा रस मिसळा. त्यात ताजी ग्रीन टी मिसळा. क्रीम सारखं होईपर्यंत मिसळत राहा. आता या पॅकमध्ये 3 ते 4 थेंब पिपरमिंट किंवा टी ट्री तेलाचे मिसळा.
 
लावण्याची विधी- आपला चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्या. मग चेहरा आणि मानेवर पॅक लावा. 20 मिनिटानंतर पॅक धुऊन टाका. चेहरा पुसून मॉइस्चराइजर लावा.