केसांसाठी फायदेशीर पेरूची पाने
पेरू खाण्याचे अनेक फायदे आहे परंतू पेरूची पाने केसांसाठी औषधाचे काम करतात. अलीकडेच एका संशोधनात समोर आले आहे की केस गळतीवर औषधाप्रमाणे वापरले जाऊ शकतात पेरूची पाने. याने कसे दाट होतात आणि कोंड्यापासून मुक्ती मिळते. एवढंच नाही तर हे वापरल्याने केस सॉफ्ट आणि शाईनी दिसतात.
असे तयार करायचे लोशन
1 लीटर पाणी उकळवून त्यात पेरूच्या झाडाचे पानं टाकावे. 20 मिनिटापर्यंत उकळी येऊ द्यावी. गार झाल्यावर गाळून घ्यावे.
असे लावावे
सर्वात आधी शांपूने केस स्वच्छ धुऊन घ्यावे. कंडिशनर लावू नये. केस वाळल्यावर ते चार भागात वाटून त्यावर लोशन लावावे. कमीत कमी 10 मिनिट टाळूवर मसाज करावी. आता दोन तासासाठी असेच राहू द्यावे. वाटल्यास टॉवेलमध्ये केस गुंडाळून रात्रभर असेच झोपू शकता. नंतर कोमट पाण्याने केस धुऊन टाकावे. हे लोशन आठवड्यातून तीनदा लावू शकता.
ही काळजी घ्या
लोशन रूम टेंपरेचरवर गार करावे. गरम लावू नये.