मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (15:45 IST)

मुलायम त्वचेसाठी गुलाबाच्या पाकळ्यांनी बनवा बॉडी क्रीम

Rose petal body cream for soft skin Make Body Cream For Soft skin मुलायम त्वचेसाठी गुलाबाच्या पाकळ्यांनी बनवा बॉडी क्रीम Beauty tips in marathi for Make Body Cream For Soft skin Rose petal body cream tips in marathi beauty tips in marathi Webdunia Marathi
आपण अनेकदा आपल्या प्रियजनांना गुलाब देतो. हे फूल केवळ प्रेमाचे प्रतीक नसून ते त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गुलाबाच्या पाकळ्यांनी गुलकंद तयार  होतो. आपण पाकळ्यांनी मॉइश्चरायझिंग क्रीम तयार करू शकता. ही क्रीम बॉडी लोशन म्हणून वापरू शकता. सध्या बाजारात अनेक उत्तम बॉडी लोशन मिळतात . पण घरी बनवलेले लोशन शुद्ध असते. त्यात  कोणते पदार्थ वापरत आहात हे आपल्याला माहीत असते. अशा परिस्थितीत बॉडी लोशन घरी कसे बनवता येईल हे जाणून घेऊ या.
घरी बॉडी क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात रात्रभर भिजवा. आपण गुलाबजल देखील घेऊ शकता. नंतर कढईत शिया बटर टाका आणि वितळू द्या. ते वितळल्यावर गॅसवरून उतरवा आणि थोडे थंड होऊ द्या. नंतर त्यात खोबरेल तेल मिसळून काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा. आता त्यात तयार केलेले गुलाबजल मिक्स करून त्याची कंसिस्टन्सी घट्ट करा. बॉडी क्रीम तयार आहे, एका कंटेनरमध्ये भरा. 
गुलाबाच्या पानांमध्ये अँटी बेक्टेरिअल आणि एस्ट्रिंजेंट गुणधर्म असतात. जे त्वचेला हायड्रेट करण्यात मदत करतात. तसेच गुलाबपाणी त्वचेला मॉइश्चरला  संतुलित ठेऊन वाढत्या वयाचे चिन्ह कमी करते. दुसरीकडे, शिया बटरमध्ये व्हिटॅमिन ए  आणि ई असतात. हे आपल्या त्वचेला मऊ करते.