1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 22 जून 2024 (16:16 IST)

चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे तिळाचे तेल, जाणून घ्या कसा करावा उपयोग आणि फायदे काय

tilache tel
जेव्हा वातावरण बदलते तेव्हा प्रदूषण वाढत असते, यामुळे आपली त्वचा कोरडी आणि खराब होते. अनेक वेळेस त्वचेवर पिंपल्स, सूज आणि पुटकुळ्या या समस्या निर्माण होतात.यापासून सुटका मिळण्यासाठी   आपण पार्लर मध्ये जाऊन महाग ट्रीटमेंट करतो. आयुर्वेदात काही उपाय आहेत ज्यामुळे आपली त्वचा सुरक्षित राहण्यास मदत मिळते आयुर्वेदातील त्या उपयांपैकी एक उपाय आहे तिळाचे तेल. तर जाणून घेऊ या तिळाचे तेल आपल्या त्वचेसाठी किती फायदेशीर आहे.
 
तिळाचे तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. यांमध्ये व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सीडेंट आणि फॅटी एसिड भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे त्वचेला अनेक फायदे मिळतात. याकरिता अनेक लोक याचे क्लींजर, मॉइश्चराइजर, मास्क आणि फेस पॅक मिसळून लावतात. हे त्वचेला हाइड्रेट ठेवते. सोबतच याने मसाज केल्यास चेहऱ्यावर तेज येते. 
 
तिळाचे तेल आजकल बाजारात सहज उपलब्ध होते.तिळाच्या तिळाने त्वचा मऊ आणि चमकदार बनते. सोबतच हे कोरड्या त्वचेला ओलावा देण्याचे काम करते, सुरकुत्या, अँटी-एजिंग आणि सूज देखील कमी करते. जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आणि डाग दिसत असतील तर चेहऱ्यावर तिळाच्या तेलाचा मसाज करू शकतात.
 
तिळाचा तेलाचा उपयोग करण्यासाठी याला त्वचेवर लावू शकतात. अंघोळ केल्यानंतर ओल्या त्वचेवर लावल्यास खूप फायदे मिळतात. तसेच रात्री झोपण्यापूर्वी देखील लावू शकतात. नियमित तेलाचे तेल लावल्यात त्वचा आरोग्यदायी आणि सुंदर दिसेल. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
 
Edited By- Dhanashri Naik