शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (08:45 IST)

सौंदर्य सल्ला -या उपायांसह उन्हात त्वचेची काळजी घ्या

उन्हात येतातच त्वचेचा रंग गडद होतो. सूर्य प्रकाश,धूळ आणि उष्णतेमुळे त्वचेचा रंग गडदचं होत नाही तर इतर त्वचेच्या समस्या देखील सुरू होतात. मुरूम येणं,काळे डाग,पुरळ येतात. अशा परिस्थितीत त्वचेची काळजी घेण्याची आवश्यकता असते. या साठी काही उपाय आहेत ज्यांना अवलंबवून आपण त्वचेची काळजी घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 भरपूर पाणी प्या- 
सुंदर त्वचेसाठी आवश्यक आहे की भरपूर पाणी प्यावं. दिवसातून किमान सहा ते सात ग्लास पाणी प्या. या मुळे पोट देखील चांगले राहील आणि त्वचा टोन्ड राहील. 
 
2 सनग्लासेस -
उन्हात बाहेर जाताना सनग्लासेस न लावता बाहेर जाऊ नका. हानिकारक यूव्ही किरणामुळे डोळ्याच्या खाली सुरकुत्या येतात. म्हणून उन्हात बाहेर जाताना सनग्लासेस वापरा. 
 
3 सनस्क्रीन -
सनग्लास च्या व्यतिरिक्त उन्हात निघण्यापूर्वी चांगल्या प्रतीचे सनस्क्रीन लावूनच बाहेर पडावे. लक्षात ठेवा की हे सनस्क्रीन घरातून बाहेर पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी लावायचे आहे. सनस्क्रीन लावल्यावर ताबडतोब घरातून बाहेर निघू नका. दिवसातून किमान 3 वेळा सनस्क्रीन लावा. 
 
4 कपड्यांची योग्य निवड करा- 
उन्हाळयात जास्त कपडे परिधान करणे तर शक्य नाही. आपण असं काही घाला ज्या मुळे शरीर झाकले राहील, सैलसर कपडे घाला, या ,मुळे घाम येणार नाही आणि मुरूम देखील होणार नाही. चेहऱ्याला झाकण्यासाठी हॅट घाला आणि स्कार्फ वापरा.
 
5 कोमट पाणी आणि दूध- 
एका बादलीत कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये सहा कप दूध मिसळा आणि  त्या पाण्यात पाय बुडवून ठेवा. असं केल्यानं शरीराचा तापमान कमी होईल आणि त्वचा मऊ होईल. 
 
6 स्किन उत्पादनांची योग्य निवड करा-
आपल्या त्वचेच्या अनुरूपच त्वचेच्या उत्पादनांची निवड करा. आपल्याला कोणत्याही  प्रकारचे संसर्ग होऊ शकते.  
 
7 अँटी ऑक्सीडेन्ट लोशन- सूर्यप्रकाशामुळे सनबर्न झाले असल्यास सनबर्न स्क्रीनसाठी अँटीऑक्सिडंट सौम्य लोशन वापरा. या मुळे त्वचा चांगली होईल.