शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

किचनमध्ये असलेल्या या 5 वस्तू, लगेच दूर करतील टॅनिंग, त्वचा होईल चमकदार

उन्हाळ्यात त्वचेला अनेक प्रकारच्या समस्या येतात. उन्हात निघाल्यामुळे त्वचा काळी पडते व खराब होते. टॅनिग झाल्यामुळे त्वचेचा रंग डार्क होतो. तसेच त्वचा रुक्ष दिसायला लागते. अनेक लोक या समस्यांपासून सुटका होण्यासाठी अनेक प्रकारचे प्रोडक्ट्स वापरतात. अनेक वेळेस यांचे साईड इफेक्ट्स होतात. आम्ही तुम्हाला अशा काही वस्तूंबद्दल सांगणार आहोत ज्या त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी मदत करतात. 
 
टोमॅटो- टॅनिंग पासून मुक्ती मिळण्यासाठी टोमॅटोचा उपयोग करू शकतात. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सीडेंट असते जे तुमच्या त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी मदत करते. टोमॅटोचा रस त्वचेला लावल्यास त्वचा उजळते.  
 
बटाटा- टॅनिंग दूर करण्यासाठी बटाटा महत्वपूर्ण असतो. यामध्ये ब्लिचिंग गुण खूप प्रमाणात असतात. जे तुमच्या त्वचेला स्वच करण्यासाठी मदत करतात. बटाट्याचा रस कॉटनच्या मदतीने चेहऱ्यावर लावावा. मग 15 मिनिट नंतर धुवून घ्यावे. यामुळे त्वचा स्वच्छ होते व उजळते. 
 
हळद- हळदीमध्ये अँटीऑक्सीडेंट और अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. जे त्वचेवरील मुरूम दार करण्यास मदत करतात. दुधात चिमूटभर हळद मिक्स करावी व कॉटनच्या मदतीने चेहऱ्यावर लावून 15 मिनिटांनी धुवून टाकावे. यामुळे तुमची त्वचा उजळेल. 
 
बेसन- बेसन त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. बेसन त्वचा उजळ बनवते. याचा उपयोग पॅक किंवा स्क्रब रूपात करू शकतात. याकरिता दुधात, दही, गुलाबजल, बेसन हे मिक्स करून लावावे. 
 
एलोवेरा- त्वचासंबंधित अनेक समस्यांसाठी एलोवेरा फायदेशीर असते. एलोवेरामधील गुण त्वचेचे इन्फेक्शन दूर करते. तसेच त्वचा उजळ आणि स्वच्छ बनवते. रोज रात्री झोपण्यापूर्वी एलोवेरा जेल लावावे. व सकाळी उठल्यावर धुवून घ्यावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik