शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 3 जून 2021 (09:25 IST)

साथीच्या रोगाने बदलले हे सौंदर्य ट्रेंड्स या 5 गोष्टींचा कल वाढेल

साथीच्या रोगाचा प्रभाव अजून किती वर्ष राहणार हे सांगणे कठीण आहे.लसीकरणाच्या दोन्ही डोसानंतरही कोरोना होऊ शकतो.परंतु हे निश्चित आहे की त्याचा प्रभाव जास्त होणार   नाही. कोरोना कालावधीत  प्रत्येकाच्या जीवनावर खोल परिणाम झाला. ते कोणत्याही स्वरूपात असो. लॉकडाऊन दरम्यान काही चांगल्या गोष्टी देखील घडल्या आहेत ज्यांचे महत्त्व यापूर्वी फारसे समजले नव्हते. परंतु लॉकडाऊन दरम्यान, चेहरा उजळला आहे तसेच काही इतर बदलही आगामी काळात दिसणार आहेत. चला काय आहे ते बदल जाणून घेऊ या.
 
1 डोळ्यांचा मेकअप -बाहेर कुठे ही जायचे असल्यास मास्क लावणे बंधनकारक आहे. लग्नसराय असो किंवा समारंभ असो किंवा काही ही कार्यक्रम असो. डोळ्यात काजळ आणि मस्कराचा ट्रेंड वाढेल .डोळ्यांच्या मेकअपचा ट्रेंड वाढेल. एवढेच नव्हे तर ब्यूटी प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या कंपन्या देखील  डोळ्यांसाठी वेगवेगळ्या उत्पादनांवरही अधिक लक्ष देतील.
 
2 लिपस्टिक - लिपस्टिक लावल्यानंतर  मास्क लावू शकत नाही किंवा जर मास्क लावला तर  लिपस्टिक लावू शकत नाही. मास्क  लावणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत ओलावामुळे लिपस्टिक पसरू शकते आणि आपला चेहरा देखील खराब होऊ शकतो. अशा परिस्थितीत, लोक नैसर्गिक पद्धतीने त्यांचे ओठ गुलाबी बनविण्यासाठीचे उपाय करतील.
 
3 नैसर्गिक त्वचा - साथीच्या रोगाच्या वेळी प्रत्येकजण सुरक्षेसाठी आपापल्या घरात कैद आहेत. यावेळी आपण आपल्या त्वचेवर कोणत्याही प्रकारचे उत्पादन वापरत नाही. यामुळे त्वचेला सर्व नैसर्गिक घटक मिळत आहेत आणि कोणत्याही प्रकारे कोणतीही हानी पोहोचत नाही. कदाचित येणाऱ्या काळात कमी सौंदर्य उत्पादनांचा वापर केला जाईल.
 
4 घरगुती उपचार -जिथे दररोज सौंदर्यप्रसाधने वापरली जात होती, आता उत्पादने उपलब्ध नसताना घरगुती उपचारांचा वापर केला जात आहे. वेगवेगळ्या प्रकारे गरम पाण्याची वाफ चेहऱ्यावर घेतली जात आहे. जेणेकरून चेहर्‍याची चमक कायम राहील.
 
5 फेस योग- सध्या चेहऱ्याला वारंवार स्पर्श करू शकत नाही त्यासाठी फेस योगा महत्वाचा आहे.जेणे करून नैसर्गिक पद्धतीने चेहऱ्याला योग्य आकार दिला जावो.इतर उत्पादनाचा वापर देखील कमी केला जावो.