मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (22:19 IST)

व्हाईट हेड्सपासून मुक्त होण्यासाठी हे 5 घरगुती फेस पॅक वापरा

वाढते प्रदूषण आणि धूळ-मातीमुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वाढत्या प्रदूषण, आहार, जीवनशैली, मेकअप आणि हार्मोनल असंतुलन यामुळे त्वचेवर मुरुम, पुळ्या,सुरकुत्या आणि डाग यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. जेव्हा त्वचेची छिद्रे धूळ, मृत त्वचा आणि तेलाने अडकतात, तेव्हा व्हाइटहेड्स बाहेर येऊ लागतात.
 
आजकाल व्हाईटहेड्स दूर करण्यासाठी बाजारात अनेक सौंदर्य उत्पादने उपलब्ध आहेत, परंतु काही वेळा त्यांच्या वापराने व्हाइटहेड्सची समस्या संपत नाही. असे अनेक घरगुती उपाय आहेत ज्याचा वापर करून आपण व्हाईटहेड्सपासून मुक्ती मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
 
1 हळद आणि मध फेस पॅक -
आयुर्वेदात हळदीला औषधी गुणधर्मांचा खजिना मानला जातो. हळदीचा वापर अनेक शतकांपासून चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी केला जात आहे. हे चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी काढून, बॅक्टेरिया काढून टाकण्याचे काम करते. व्हाइटहेड्सच्या समस्येवर हळद आणि मधाचा फेस पॅक वापरता येतो. यासाठी अर्धा चमचा हळद पावडरमध्ये 1 चमचा मध मिसळून चेहऱ्याला लावा. 15 मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
 
2 साखर आणि लिंबाचा फेस पॅक -
व्हाईटहेड्सपासून सुटका मिळवण्यासाठी साखर आणि मधाचा फेस पॅक वापरू शकता. साखरेमध्ये त्वचा स्वच्छ करण्याचे गुणधर्म असतात. त्याच वेळी, लिंबूमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात जे व्हाईटहेड्स काढून टाकण्यास मदत करतात. 
मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात जे चेहऱ्यावर बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखतात. हा फेस पॅक बनवण्यासाठी एक चमचा साखर आणि एक चमचा मध एकत्र मिसळा. नंतर त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका आणि व्हाइटहेड्सवर लावा आणि 10 मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.  
 
3 बेकिंग सोडा फेस पॅक -
बेकिंग सोडा फक्त स्वयंपाक आणि बेकिंगमध्येच वापरला जात नाही तर आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. त्यात त्वचेला खोल साफ करण्याचा गुणधर्म आहे. हे छिद्र स्वच्छ करते आणि ते उघडते. व्हाईटहेड्स दूर करण्यासाठी दोन ते तीन चमचे बेकिंग सोडामध्ये दोन ते तीन थेंब पाण्यात मिसळा आणि व्हाइटहेड्सवर लावा आणि 15 ते 20 मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. 
 
4 ओटचे पीठ आणि मध पॅक -
ओटचे पीठ आपल्या त्वचेसाठी उत्तम एक्सफोलिएटर म्हणून काम करू शकते. त्याच वेळी, मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात जे चेहऱ्यावर बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखतात. व्हाइटहेड्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी ओटमील आणि मधाचा फेस पॅक बनवून चेहऱ्याला लावू शकता. यासाठी 2 चमचे मधामध्ये एक चमचा ओटमील पावडर मिसळून व्हाईटहेड्सवर लावा. साधारण 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने स्वच्छ करा.
 
5 अंडी मध फेस पॅक -
अंड्यांचा वापर फक्त खाण्यासाठीच होत नाही तर सुंदर आणि नितळ त्वचा मिळवण्यासाठीही केला जातो. चेहऱ्यावरील व्हाईटहेड्स दूर करण्यासाठी अंडी आणि मधाचा फेस पॅक चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी अंड्याच्या पांढऱ्या भागात एक चमचा मध मिसळा आणि चांगले फेटून घ्या. आपल्या चेहऱ्यावर लावा आणि 10-15 मिनिटे सोडा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.