1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 28 फेब्रुवारी 2021 (09:00 IST)

काय सांगता , त्वचेसाठी फायदेशीर आहे कापूर

What to say
उन्हाळ्याच्या उष्णतेसह मुरूम आणि पुरळ  चेहऱ्यावर दिसू लागतात. त्याच वेळी त्वचा तेलकट होण्याची समस्या देखील वाढते. उन्ह्याळ्यात चेहऱ्यावरून घामासह जास्तीचे तेल देखील बाहेर येऊ लागते, त्यामुळे चेहऱ्यावर पुरळ येऊन चेहरा निस्तेज दिसू लागतो. परंतु आपणास माहिती आहे का पूजेत लागणारे कापूर त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. या मध्ये अँटी ऑक्सीडेन्ट आणि अँटिसेप्टिक गुणधर्म असल्यामुळे हे पुरळ आणि मुरुमं रोखण्याचे काम करतो .चेहऱ्यावरील असलेले डाग आणि टॅनिग देखील दूर करतो कापूर वेगवेगळ्या वस्तूंसह वापरतात चला तर मग जाणून घेऊ या कापूराचा वापर कसा करावा.   
 
* नारळाचं तेल आणि कापूर- 
नारळाचं तेल आणि कापुराचे फेसपॅक बनविण्यासाठी नारळाच्या एक कप तेलात दोन चमचे कापूर बारीक वाटून मिसळा. रात्री झोपताना या तेलाने मॉलिश करा. हे असेच ठेवा.धुऊ नका. नारळाच्या तेलात लॉरिक ऍसिड असते आणि कापूर चेहऱ्याची घाण स्वच्छ करण्याचे काम करतो. हे पॅक लावल्याने त्वचा उजळते. 
 
* मुलतानी माती आणि कापूर - 
चेहऱ्यावर मुरूम आले आहे आणि त्याच्या डागाने वैतागला आहात तर मुलतानी माती आणि कापूर एकत्र करून लावा. या साठी एक चमचा मुलतानी माती घेऊन या मध्ये एक तुकडा कापूर घाला.गुलाबपाण्याच्या साहाय्याने पॅक बनवा हे पॅक चेहऱ्यावर लावून 15 मिनिटे तसेच ठेवा.नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.हे पॅक चेहऱ्यावरील डाग काढण्यात मदत करतो.
 
* हरभराडाळीचे पीठ आणि कापूर -
हरभराडाळीच्या पिठात कापूर आणि गुलाबपाणी मिसळून पॅक बनवून लावू शकता. हे पॅक चेहऱ्यावरील सूज कमी करण्यात मदत करतो. तर हरभरा डाळीचे पीठ त्वचेला एक्सफॉलिएट करण्याचे काम करतो.